पुणे

रंगांची उधळण; सुगंधाचा दरवळ

CD

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः पानाफुलांच्या नाजूक पाकळ्यांवर उमललेली रंगांची विलोभनीय दुनिया, वातावरणात दरवळणारा मंद सुगंध आणि निसर्गाच्या कुशीत साकारलेली कलात्मकता अनुभवण्याची सुवर्णसंधी रसिकांना मिळणार आहे. निसर्ग, कला आणि संस्कृतीचा एकाचवेळी अनोखा आविष्कार घडवून आणणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या ‘ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हल २०२६’चे भव्य आयोजन ‘सकाळ’तर्फे केले आहे. या महोत्सवासाठी ‘केएसबीपी’ हे नॉलेज पार्टनर असून संकल्पना व अंमलबजावणी ग्रीन आर्मी यांची असणार आहे. ११ ऑक्टोबरपासून सलग नऊ दिवस हा निसर्गसौंदर्याचा सोहळा कोल्हापूरकरांना अनुभवता येणार आहे.
‘ब्लूम्स् बियॉन्ड बॉर्डर्स’ या संकल्पनेतून साकारणारा हा महोत्सव जगभरातील निसर्गसौंदर्याला एकाच छताखाली एकत्र आणणार आहे. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या महोत्सवात देश-विदेशातील दुर्मीळ आणि आकर्षक फुलांचे नयनरम्य गालिचे पाहायला मिळतील. आधुनिक लँडस्केपिंगच्या साहाय्याने उभारलेली दालने, फुलांच्या माध्यमातून साकारलेल्या जिवंत कलाकृती आणि रंगांची मनमोहक उधळण खिळवून ठेवणार आहे.
निसर्गाची आवड जपणाऱ्या प्रत्येकासाठी हा सोहळा बहुविध पैलूंनी सजवला आहे. हौशी बागकामप्रेमींसाठी उपयुक्त प्रात्यक्षिके, पुष्पसजावटीच्या आंतरराष्ट्रीय पद्धतींची माहिती देणाऱ्या कार्यशाळा, छायाचित्रकारांसाठी निसर्गाची विविध रूपे टिपण्याची संधी आणि विद्यार्थ्यांसाठी कल्पक स्पर्धांची रेलचेल येथे अनुभवता येईल. कुटुंबीयांसह येणाऱ्या प्रत्येकाला निसर्गाचा आनंद घेता यावा, यासाठी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यावरण संवर्धन आणि हरित जीवनशैलीवर आधारित विशेष संवादाचे आयोजनही केले आहे.
-----

सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा
या महोत्सवाचा परीघ अधिक विस्तारण्यासाठी आणि नागरिकांना यात थेट सहभागी करून घेण्यासाठी ‘जीएफएफ’ या समुदायाची निर्मिती केली आहे. पुष्पप्रेमी, कलाकार, विद्यार्थी, छायाचित्रकार, स्वयंसेवक, व्यावसायिक आणि प्रायोजक यांना या महोत्सवाचा भाग होता यावे, यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. नोंदणी अर्जाद्वारे नागरिक या उपक्रमाशी जोडू शकतात. नोंदणीकृत सदस्यांना आगामी कार्यशाळा, स्पर्धा, तिकीट आरक्षण, प्रदर्शनाचे तपशील आणि महोत्सवाच्या रूपरेषेची माहिती वेळोवेळी दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी सूरज (९५५२५८१९१८), प्रतीक (९१३०४४६५६६) यांच्याशी संपर्क साधावा.
----
असा सजणार ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हल
कधी ः ११ ते १९ ऑक्टोबर २०२६
कुठे ः पोलिस मुख्यालयाशेजारील उद्यान, ट्रॅफिक गार्डन परिसर
केव्हा ः सकाळी सात ते रात्री दहा
-----
महोत्सवाचे आकर्षण
- विविध फुलांच्या कलाकृती
- नाईट ब्लूम अनुभव
- सांस्कृतिक कार्यक्रम
- लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग
- मनोरंजन पार्क
- इन्स्टाग्राम स्पॉटस्‌
- दुर्मीळ फुलांचा संग्रह
- खाद्यपदार्थांची रेलचेल
---
लोगो
64234

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT