पुणे

जकातवाडीत जागतिक शांती दिन उत्साहात

CD

जकातवाडीत जागतिक शांती दिन उत्साहात
सातारा, ता. २२ : जागतिक शांतता, अहिंसा, सद्‌भावना आणि परस्पर सहकार्याचा संदेश जनमानसात पोचविण्याच्या उद्देशाने जकातवाडी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात शांती दिनाचे आयोजन करण्‍यात आले होते.
सुरुवातीस ब्रह्माकुमारी शांता बहेनजी यांनी उपस्थितांकडून विश्वशांतीचा संकल्प घेतला. शांततेचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या कबुतराचा संदेश देत ‘शांती ही केवळ बाह्य परिस्थिती नसून ती प्रत्येक व्यक्तीच्या मनापासून सुरू होते,’ हा विचार त्‍यांनी उपस्‍थितांसमोर मांडला. भारताने जगाला दिलेल्या पंचशीलाच्या तत्त्वांमध्ये एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा व प्रादेशिक अखंडतेचा सन्मान, परस्परांवर आक्रमण न करणे, अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे, समानता व परस्पर लाभ आणि शांततापूर्ण सहअस्तित्व या मूल्यांचा समावेश आहे. या तत्त्वांचा जीवनात स्वीकार केल्यास समाजात परस्पर विश्वास, बंधुभाव आणि शांततापूर्ण सहजीवनाची भावना निर्माण होऊ शकते, असा विश्‍वासही त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. कार्यक्रमात राजयोग ध्यान, आत्मचिंतन आणि शांततेचा अनुभवावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी महिला, युवक, तसेच ब्रह्माकुमारीज सेवास्थानाशी जोडलेले बंधू-भगिनी उपस्‍थित होत्‍या. सहाय्यक अधीक्षक अभियंता धनाजी पांडुरंग माने यांनी सूत्रसंचालन केले.
...............................
फोटो :........ 51725
जकातवाडी : शांती दिन कार्यक्रमात सहभागी शांता बहेजनी, धनाजी माने व इतर मान्‍यवर.
...........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

SCROLL FOR NEXT