पुणे

डॉक्टर फ्रेंडस असोसिएशनतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

CD

फुलवडे, ता. ११ : जागतिक आदिवासी दिनानिमित्त पाटण (ता. आंबेगाव) तसेच कुशिरे, पिंपरी भोईरवाडी, मेघोली येथील प्राथमिक शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. डॉक्टर फ्रेंडस असोसिएशन पुणे यांच्या वतीने रविवारी (ता. ९) हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शालेय साहित्यात दप्तर, टिफीन, वह्या, स्वच्छतेचे साहित्य आदींचा समावेश होता. तसेच शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांना डायरी, पेन भेट देण्यात आली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अंबाजी शेंडगे, डॉ. आनंद पालीमकर, डॉ. सुरेश गभाले, केंद्र प्रमुख निळकंठ कोरडे, पाटणचे सरपंच लक्ष्मण मावळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. विक्रांत खेसे, डॉ. रोहन नरवडे, डॉ. नवनाथ भोर आदी उपस्थित होते. संतोष आचार्य यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश बांगर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! पुढील २-३ तासात पावसाचा जोर वाढणार, आयएमडीचा इशारा

फक्त ६ एपिसोड पण सगळीकडे फक्त याच सीरिजची चर्चा! नेटफ्लिक्सवर येताच ठरली नं. १ ; तुम्ही पाहिलीत का?

Sunil Tatkare यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला पक्षातूनच विरोध, नेमकं काय घडतंय?

Marathi News Live Updates : हार्बर लोकल पावसामुळे 10-15 मिनिटं उशीराने

Har Ghar Tiranga 2026 : १५ ऑगस्टपूर्वी पंतप्रधान मोदींचा खास संदेश; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचं देशवासियांना आवाहन

SCROLL FOR NEXT