कळवणला जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन
नाशिक : आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यासाठी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शनिवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते सायं. ४ या वेळेत श्री साई लॉन्स, नाकाडो रोड, कळवण येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमास आदिवासी बांधवांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी (विकास) नितांत कांबळे यांनी केले आहे. या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारे पारंपरिक नृत्य, लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शासनाच्या विविध विभागाचे, वनौषधी, रानभाजी, लघु उद्योग, वारली पेंटिंग यांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. तसेच आदिवासी पारंपारिक नृत्य पथक व विद्यार्थी यांचे सादरकीकरण करण्यात येणार आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून आदिवासी महिला, युवक, युवती यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात आदिवासी बांधव, लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
------------
सारोळे सोसायटीच्या अध्यक्षपदी पाटील
कसबे सुकेणे: सारोळे खुर्दविविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पाटील डुकरे यांची बिनविरोध निवड झाली. पिंपळगाव बाजार समितीचे संचालक दिलीप मोरे यांच्यासह अनेकांनी त्यांचा सत्कार केला. श्री.डुकरे यांनी कर्मवीर काकासाहेब वाघ साखर कारखान्याचे अध्यक्षपदही भूषविले आहे. निवडीबद्दल द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, पंडित महाराज कोल्हे आदींनी अभिनंदन केले
---------
शेतात गळफास घेऊन भाटगाव येथे आत्महत्या
भाटगाव: भाटगाव (ता.चांदवड) येथील गोकुळ निंबा गवळी (वय ४४) यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. राधिका बाळकृष्ण वाघ यांच्या शेतातील बांधावर असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत महेश गवळी (रा.भाटगाव,ता.चांदवड) यांनी वडाळीभोई पोलिस ठाण्यात माहिती दिली. या प्रकरणी वडाळीभोई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी सानप करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.