पुणे

गो संरक्षण कायदा

CD

गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्याची शासनाकडे मागणी

गोसन्मान अभियानांतर्गत आर्वीत तहसीलदारांना निवेदन

ॲग्रोवन वृत्तसेवा
आर्वी, जि. वर्धा : देशी गोवंश संरक्षण व संवर्धनासाठी केंद्र शासनाने कठोर कायदे करावेत तसेच गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी गोसन्मान अभियानांतर्गत आर्वी येथे शासनाला निवेदन देण्यात आले. तहसीलदार हरीश काळे यांच्यामार्फत हे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले.
निवेदनात देशी गोवंश हा भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य घटक असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत देशी गोवंशाची संख्या आणि संवर्धनाची स्थिती चिंताजनक बनली असल्याने केंद्र सरकारने स्वतंत्र ‘गोसेवा संरक्षण अधिनियम’ लागू करावा, यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय देशी गोवंशाला ‘राष्ट्रीय माता’ किंवा ‘राष्ट्रीय आराध्य’ म्हणून मान्यता द्यावी, गो-तस्करी आणि गोवध करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करावी, ग्रामपंचायत स्तरावर नंदी शाळा आणि जिल्हास्तरावर गोशाळा सुरू कराव्यात, तसेच शालेय अभ्यासक्रमात ‘गो-विज्ञान’ विषयाचा समावेश अनिवार्य करावा, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
निवेदन सादर करताना गोभक्तांसह प्रत्यक्ष गोमाता आणि नंदीची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. या वेळी मिथिलेश बिजवे, सुरेंद्र पारसे, रमेश नागोसे, नंदू वैद्य, प्रशांत सव्वालाखे, श्रीकांत पेंडके, सुनील पारसे, महेंद्र गोमासे, बंटी बत्रा, नगराध्यक्ष स्वाती गुल्हाणे, गौरव जाजू, संजय थोरात, प्रकाश गुल्हाणे, संजय कटकमवार, लवेश गलोले, प्रशांत ठाकूर, देशपांडे, राजू मांजरे, सुनील बाजपेयी यांच्यासह महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Controversy : NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत; नाशिकचा 30 वर्षीय BAMS विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात, क्राईम ब्रँचने असा रचला सापळा

Virat Kohli ने ज्या मॉडेलची पोस्ट लाईक केली होती, तिचा खळबळजनक दावा; म्हणाली, 'मला पैशांचं आमिष दाखवलं'

Mumbai News: पालिका शाळेत संविधानाचे धडे, शिक्षण समितीसमोर अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरण, १६ संशयित आरोपी तपास यंत्रणांच्या ताब्यात

Navi Mumbai: नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा कपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT