Pune
Pune Sakal
पुणे

देवी हाच आमच्या जगण्याचा आधार

सकाळ वृत्तसेवा

कोथरुड : कोथरुडच्या (kothrud) सागर कॉलनीत देवीची गादी चालवणा-या नंदीनी कांबळे म्हणतात की, आमची देवी हाच आमच्या जगण्याचा आधार आहे. देवीची मनोभावी सेवा करणे हाच आमचा धर्म आणि तीच आमची इच्छा आहे.

ट्रान्स जेन्डर असलेल्या नंदीनी कांबळे यांच्या सागर कॉलनीतील छोट्याश्या घरात देवतांचा मोठा देव्हारा आहे. या देव्हा-यात तुळजा भवानी, येडेश्वरी, काळुबाई, लक्ष्मीआई आणि महाकाली अशा पाच देवतांच्या मुर्ती आहेत. तेथे त्यांनी दोन घट बसवले होते. एक घट घरातील कुलदैवतचा तर दुसरा देवीचा. पाच देवींची ओटी भरली आहे. या पाचही देवीच्या मुर्त्या चांदीच्या असून सोन्या मारुती चौकातून घडवलेल्या आहेत. ज्या देवीची मुर्ती असेल तीच्या मुळस्थानी जावून अभिषेक, पुजा अर्चना करुन मुर्तीची देवीशी भेटवणूक करुन घरातील देव्हा-यात मुर्तीची विधीवत स्थापना केलेली आहे. याशिवाय सिध्दनाथ, खंडोबा, काळुबाईचे शिपाई मांगीर बुवा, गोंजीर बुवा धावजी पाटील, म्हसोबा आदी देव्हा-यात आहे. नंदीनीच्या घरी नऊ दिवसाचे घट असतात. अष्टमीचा होम होतो. बाण खेळत, छबीना काढून, आनंद व्यक्त करत आम्ही देवीच्या मंदिरात जातो. सोन वाटायचे. नैवेद्य दाखवायचा. परड्या भरायचे. उपवास सोडायचा असे विधी करतो. शीलांगण झाल्या नंतर देवी शांत होते.

नंदीनी म्हणाल्या की, देवीची गादी चालवण्यावरच आमची उपजिवीका चालते. कोरोना काळात आमचे सर्व कार्यक्रम बंद होते. त्याचा त्रास आम्हाला जास्त झाला. देवी जगदंबा आमच्या हातून कार्य करुन घेते. कोरोना काळात आमची उपासमारी झाली पण आता देवाच्या कृपेने सर्व व्यवस्थित चालले आहे.

जयभवानीनगर, वनदेवी, चतुश्रृंगी, तळजाई, पद्मावती आदी मंदिरात जावून नंदीनी त्यांच्या सहका-यांसह जातात. आरती करणे, जोगवा मागणे, फेरीला जाणे, ज्यांच्या घरी देवी बसवली आहे त्यांच्या घरी जावून आरती करणे यातून त्यांची उपजिवीका चालते. नंदीनी म्हणाल्या की, कोरोना पुर्वीच्या काळात सर्व व्यवस्थित चालु होते. पुर्वी न मागता लोक द्यायचे. आज अशी स्थिती आहे की, पुर्वी जेथे दोन रुपये मिळतात तेथे पन्नास पैशेच मिळत आहेत. आता पुढील वर्षी चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे.

नंदीनीचे शिक्षण आठवी झाले आहे. तर त्यांची सहकारी असलेल्या स्वीटीचे अकरावी शिक्षण झाले आहे. आज नंदीनीचे स्वतःचे असे पन्नास शिष्य आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या घरात देव्हारा असून. ते तेथे सेवा करतात. नंदीनीचे गुरु विक्रांत गायकवाड यांचे सहकार्य त्यांना मिळते.

नंदीनी, स्वीटी वा त्यांच्या सहकार्यांपर्यत सरकारी योजना पोहचल्याच नाहीत. जर काही योजना असतील तर त्याबद्दल त्यांना फारशी माहिती नाही. काही संस्था, व्यक्तींनी धान्य, रेशन देवून कोरोना काळात सहकार्य केले याचा ते आवर्जून उल्लेख करतात. सरकारची त्यांच्यापर्यंत पोहचलेली एकमेव योजना म्हणजे कोरोनाचे लसीकरण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT