Bhimashankar Sanctuary 
पुणे

Pune Bhimashankar: भिमाशंकरला जाताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी; जाणून घ्या पर्यटन बंदीची ठिकाणं?

Bhimashankar Sanctuary for tourism: भिमाशंकर देवदर्शन केल्यानंतर अनेक भाविक वन्यजीव पर्यटन आणि धबधब्यांवर जात असतात. पावसाळ्यामुळे भाविकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओढा असतो.

कार्तिक पुजारी

पुणे- लोणावळ्यातील घटनेने सगळ्यांना हादरवून सोडलं आहे. त्यानंतर भिमाशंकर अभयारण्य प्रशासन सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. भिमाशंकर देवदर्शन केल्यानंतर अनेक भाविक वन्यजीव पर्यटन आणि धबधब्यांवर जात असतात. पावसाळ्यामुळे भाविकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओढा असतो.

अभयारण्यात अनेक अंतर्गत निसरडे रस्ते आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी हे धोक्याचं ठरू शकतं. अंतर्गत निसरडे रस्त्यांचा धोका लक्षात घेऊन पर्यटकांचे अपघात रोखण्यासाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर पर्यत भिमाशंकर अभारण्यात पर्यटकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.

पर्यटकांसाठी धोकादायक ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना उत्साही पर्यटकांनी त्याठिकाणी प्रवेश केल्यास वन्यजीव संरक्षक कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. भिमाशंकर अभयारण्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

पर्यटन बंदीची ठिकाणे..

- कोंढवळ धबधबा

- चोंडीचा धबधबा

- खोपीवली क्षेत्र,

- पदरवाडी न्हाणीचा धबधबा नारीवाली सुभेदार धबधबा,

- घोंगळ घाट नाला खांडस ते भिमाशंकर मार्ग

- पदरवाडी शिडी घाट ते काठेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso Mango Price Drop in Ratnagiri : डझनाला 1500 ते 2000 रुपयांना विकला जाणारा 'हापूस' रत्नागिरीत 400 रुपये डझन; बाजारात आवक वाढल्याने घसरले दर

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स रोखणार बंगळुरूचा झंझावात? यजमान संघाला गोलंदाजांकडून अपेक्षा; पाहा संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात अटक

Solapur Crime: साेलापूरात दारूच्या नशेत खून केला अन्‌ उतरल्यावर ठाण्यात हजर; लाथ लागल्याच्या रागातून डोक्यात घातला दगड..

Pune Accident: ड्रेनेज स्वच्छ करताना तिघांचा गुदमरून मृत्यू; पुरंदर तालुक्यातील घटना, कामगार ड्रेनेजमध्ये उतरले अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT