पुणे

‘गोकुळ’ ‘अमूल’च्या दावणीला

CD

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी चार शासन नियुक्त संचालकांना दिला जाणारा मतांचा घटनाबाह्य अधिकार देवून ‘गोकुळ’ ‘अमूल’च्या दावणीला बांधण्याची सुरुवात केली आहे. याविरुद्ध कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी आज येथे विराट संघर्ष मोर्चाद्वारे राज्य सरकारला दिला.
‘गोकुळ’च्या लढ्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सामान्य माणसाला अन्यायाविरोधात उभे राहण्याची प्रेरणा मिळाली आहे. लढलो तर जिंकू शकतो, हा विश्वास निर्माण झाला असून २०२९ मध्ये महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होण्याची नांदी कोल्हापुरातून सुरु झाल्याचा विश्‍वासही पाटील यांनी मोर्चासमोर बोलताना व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) चार शासन नियुक्त संचालकांना अध्यक्ष निवडीत मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाविरोधात आज सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दसरा चौकातून निघालेला दूध उत्पादकांचा संघर्ष मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात उत्पादकांसह इतर जिल्ह्यातूनही प्रचंड लोकांनी सहभाग घेतला. काळे झेंडे, कोल्हापुरी पायताण आणि ‘गोकुळ वाचवा, लोकशाही टिकवा’च्या घोषणांनी शहर दणाणून गेले. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, विश्वजित कदम आदी सहभागी झाले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘गोकुळच्या निमित्ताने राज्य शासन सहकाराच्या मुळावरच घाव घातला आहे. हा केवळ दूध संघाचा संघर्ष नसून लोकशाही, सामान्य दूध उत्पादकांच्या अधिकारासाठी आणि गोकुळ वाचवण्यासाठी ही लढाई आहे. गोकुळ हा केवळ कोल्हापूरचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा संघर्ष झाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातून स्वयंस्फुर्तीने लोक आले आहेत. सहकारी संस्थावर प्रशासक नेमताना हा कायदा ‘गोकुळ’साठी करत आहात का, असा सवाल आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला होता. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला होता.’’

‘स्वायत्तता संपविण्याचा डाव’
कोल्हापूर जिल्ह्यात दररोज १० ते १२ लाख लिटर दूध संकलन होते. एवढ्या मोठ्या जिल्ह्यात एकही पात्र दूध उत्पादक किंवा तज्ज्ञ मिळाला नाही का? सांगलीतील व्यक्तीला ‘गोकुळ’मध्ये संचालक म्हणून आणण्याची गरज काय, स्थानिक दूध उत्पादकांना आणि कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या व्यक्तींना संधी देण्यामागचा हेतू काय, ‘गोकुळ’ची स्वायत्तता संपवण्याचा हा डाव आहे,’’ असा आरोप आमदार पाटील यांनी केला.


‘ते पाप मुश्रीफ,चंद्रकांत पाटील यांचे’
मी साडेपाच लाख शेतकऱ्यांसाठी लढत होतो; तुम्ही तुमच्या पोराबाळांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करत होता. माझा मुलगा निवडणुकीला उभा नव्हता. सामान्य माणसे उभारली होती. आम्ही जातीयवाद करणारे नाही. आम्ही सर्वजण राजर्षी शाहू महाराज यांच्या पायाजवळ बसलो आहे. आम्ही जातीयवाद मानणारे नाही. मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना लोकशाही आणि सहकार मोडीत काढायचा आहे. गोकुळमध्ये शासन मान्य संचालक आणण्याचे पाप मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांचे षडयंत्र आहे, असा आरोपही सतेज पाटील यांनी केला.
...

Political Storm in Kolhapur : "हा मोर्चा गोकुळसाठी नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदासाठी"; उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुश्रीफांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Kapil Sharma Show : "लाल मंच्युरियन पिले पड गये..."; महाराष्ट्राचे 'डॅशिंग' IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर सुनील ग्रोव्हरची भन्नाट कविता, VIDEO तुफान व्हायरल!

Climate Summit: जगाची चिंता वाढली! युद्ध आणि AIमुळे हवामान बदलाचे आव्हान झाले आणखी अवघड

Maharashtra Live News: बोलता बोलता आला हार्ट अटॅक; नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणांबद्दल महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा

Pune News: बहिणीला भाऊबीजेसाठी घरी आणायला गेला, पण घरी परतलाच नाही; पेठ घाटात भावाचा मृत्यू, नुकताच विवाह अन्..

SCROLL FOR NEXT