पुणे

कोल्हापूर: गोकुळ सिद्धगिरी महाविद्यालयात सहकार्य बद्दल बैठक

CD

पशुधन आरोग्य, प्रशिक्षणासाठी ‘गोकुळ’, सिद्धगिरीत सहकार्य करार


ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) आणि सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालय, कणेरी यांच्यात पशुधन आरोग्य, शैक्षणिक प्रशिक्षण आणि तांत्रिक सहकार्याच्या दृष्टीने प्रस्तावित सामंजस्य कराराबाबत संयुक्त बैठक झाली. गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

गोकुळचे प्रशासकीय सदस्य डॉ. चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. मुरगेप्पा, प्रा. डॉ. मार्कंडेय आदी उपस्थित होते.

सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गोकुळच्या माध्यमातून गाय, म्हैस व इतर दुधाळ जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, आजारांचे निदान व उपचार पद्धती, लसीकरण, कृत्रिम रेतन, प्रगत प्रजनन तंत्रज्ञान, वैरण विकास, संतुलित पशुखाद्य निर्मिती तसेच दुग्ध व्यवसायातील विविध तांत्रिक बाबींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याबाबत चर्चा झाली.

गोकुळमार्फत दूध उत्पादक सभासदांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय सेवांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची जोड देऊन या सेवा अधिक प्रभावी करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

गोकुळचा दुग्ध व्यवसायातील अनुभव आणि दूध उत्पादकांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम विचारात घेऊन सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाने सहकार्याचा प्रस्ताव दिल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT