पुणे

कमी वजनाच्या आकर्षक दागिन्यांना मागणी

CD

पुणे, ता. १९ : यंदा सोन्याच्या भावात झालेल्या वाढीचा परिणाम ग्राहकांच्या खरेदीच्या दृष्टिकोनावर होत असून, दागिने खरेदी करताना वजनापेक्षा त्यांचे सौंदर्य, आकर्षक डिझाइन आणि उपलब्ध बजेट यांना अधिक महत्त्व दिले जात आहे. सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी करण्याची परंपरा कायम असली, तरी वाढलेल्या भावामुळे ग्राहकांकडून कमी वजनातील; मात्र आकर्षक दागिन्यांना पसंती दिली जात आहे.

सणासुदीच्या काळात सोन्याचे दागिने खरेदी करणे परंपरा मानली जाते. त्यामुळे दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तांवर सोन्याची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. मात्र, यंदा सोन्याच्या भावात झालेली वाढ लक्षात घेता ग्राहक खरेदीपूर्वी बजेट निश्‍चित करत आहेत. त्यानुसार दागिन्यांची निवड केली जात आहे. त्यामुळे मोठ्या वजनाच्या दागिन्यांऐवजी नाजूक, दैनंदिन वापरासाठी योग्य आणि आधुनिक डिझाइनच्या दागिन्यांना मागणी वाढत आहे.

सोन्याच्या वाढलेल्या भावामुळे काही ग्राहकांकडून वजन कमी करून त्याच बजेटमध्ये दागिना घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. विशेषतः अंगठी, कानातील दागिने, पेंडंट, बांगड्या यांसारख्या तुलनेने कमी वजनाच्या दागिन्यांकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. पारंपरिक डिझाइनबरोबरच आधुनिक आणि साध्या डिझाइनलाही पसंती मिळत आहे, असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

‘‘सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी ही केवळ परंपरा नसून, ती भावनिक जिव्हाळ्याची आणि दीर्घकालीन विश्‍वासाची गुंतवणूकही आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी आवडीचे दागिने निवडताना योग्य माहिती, पारदर्शक व्यवहार आणि विश्‍वासार्ह सेवेचा अनुभव घ्यावा, हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.’’
- अमित मोडक, संचालक, पु. ना. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड

‘‘सोन्याच्या बाजारपेठेसाठी दसरा आणि दिवाळीचा सण महत्त्वाचा असतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या भावात वाढ झाली असली, तरी पुढील काळात भाव आणखी वाढतील, या अपेक्षेने ग्राहक खरेदी करत आहेत. नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढली असून, सणासुदीच्या खरेदीचा उत्साह जाणवत आहे.
- अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स

‘‘सोन्याच्या वाढलेल्या भावामुळे ग्राहक वजनापेक्षा दागिन्यांचे सौंदर्य, आकर्षक डिझाइन आणि आपले बजेट यांना अधिक महत्त्व देत आहेत. भाववाढीचा हिरे आणि नवरत्नांच्या दागिन्यांवर फारसा परिणाम झालेला नाही. त्यामुळे सोन्याचे भाव वाढल्यामुळे या दागिन्यांची मागणी वाढली आहे. माणिक, पाचू, नैसर्गिक हिरे यांचे १८ कॅरेट सोन्यामध्ये बनविलेले दागिने घेण्याचा कल वाढला आहे.’’
- सारंग लागू, संचालक, लागू बंधू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Rain Update : दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा हाय अलर्ट! तर महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी!

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Latest Marathi News Live Update : महायुतीला धक्का! फेरमतमोजणीची मागणी फेटाळली, सतेज पाटलांच्या समविचारी १३ तर महायुतीला १२ जागा

SCROLL FOR NEXT