devika ghorpade sakal
पुणे

पुण्याच्या देविका घोरपडेला सुवर्णपदक

सोळा वर्षीय देविका घोरपडेने अंतीमफेरीपुर्वी ओडिशा, पंजाब व दिल्लीच्या खेळाडूला पराभूत केले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोनिपत, हरियाना (haryana) येथे झालेल्या ज्युनिअर मुलींच्या गटाच्या चौथ्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या (pune) देविका घोरपडेने सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत मुलींच्या गटात देविका घोरपडेने ४८ ते ५० किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविताना अंतिम लढतीत हरियानाच्या खेळाडूला नमविले. सोळा वर्षीय देविका घोरपडेने अंतीमफेरीपुर्वी ओडिशा, पंजाब व दिल्लीच्या खेळाडूला पराभूत केले होते. देविकाने या सुवर्णपदका बरोबरच ‘उत्कृष्ट उदयोन्मुख मुष्टियोद्धा’ हा मानही मिळविला.

ऑगस्ट महिन्यात दुबई येथे होणाऱ्या ज्युनिअर आशियायी मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी भारतीय संघात देविकाची निवड झाली आहे. माऊंट कार्मेल प्रशालेतून दहावी इयत्तेत उत्तीर्ण झालेल्या देविकाचे राष्ट्रीय स्पर्धेतील हे तिसरे सुवर्णपदक असून याआधी केरळ आणि सबज्युनियर गटाच्या स्पर्धेत तीने हा मान मिळविला होता. देविका घोरपडे आणि सिद्रा शेख या अर्जुन पुरस्कार विजेते व माजी ऑलिंपिक खेळाडू मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

मुलांमध्ये मुंबई जिल्हा संघाच्या उस्मान अन्सारीने ४८ ते ५० किलो वजन गटात चंडीगडच्या खेळाडूला पराभूत करून सुवर्णपदक पटकाविले. तो परवेजखान यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. याशिवाय मुलींच्या गटात रायगड जिल्हा संघाच्या योगिनी पाटीलने ५० ते ५२ किलो तर अकोला जिल्हा संघाच्या कांचन सूरांसेने ८० किलोवरील गटात रौप्यपदक मिळविले.

पुणे जिल्हा संघाच्या सिद्रा शेखने ४४ ते ४६ किलो गटात, सातारा जिल्हा संघाच्या सृष्टी रासकरने ५४ ते ५७ किलो, सपना चव्हाणने ५७ ते ६० किलो गटात आणि क्रीडा प्रबोधिनीच्या शाश्वत तिवारीने ५४ ते ५७ किलो गटात मुंबई उपनगराच्या आदिती शर्माने ६३ ते ६६ किलो गटात व परभणीच्या ऋतुजा ठोंबरेने ७५ ते ८० किलो गटात ब्राँझपदक संपादिले. महाराष्ट्राला सांघिक उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण व रौप्यपदक आणि सहा ब्रॉझपदकासह दहा पदके पटकावली. या पदक विजेत्यांना अविनाश शेंडकर, शकील शेख, सागर जगताप, गजानन कबीर, अद्वैत शेंबावनेकर, रीना माने यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indias Most Richest and Poorest CM: भारतातील सर्वात श्रीमंत अन् सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? ‘ADR’ रिपोर्टमधून झाले उघड!

Crime: सुरतमध्ये अपहरण, मुंबईत संपवलं; पण कुणी? कुशीनगर एक्सप्रेसच्या शौचालयात सापडलेल्या ५ वर्षीय मुलाच्या मृतदेहाचं कोडं उलगडलं

'Vaibhav Suryavanshi ला फार सल्ले द्यायला जाऊ नका...', रायुडू असं का म्हणाला? वाचा

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

SCROLL FOR NEXT