Gold sari for Shri Mahalaxmi Devi  
पुणे

सारसबागेतील श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी

सकाळ वृत्तसेवा

पुणे- शहरातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी देवीला विजया दशमीच्या निमित्ताने सोन्याची साडी अर्पण करण्यात आली आहे. तब्बल १६ किलो सोन्याची साडी परिधान केलेल्या देवीचे सुवर्णवस्त्रातील रुप विलोभनीय आणि लक्ष वेधून घेणारे आहे.

दस-याच्या निमित्ताने दरवर्षी सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी देवीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. यावेळी सर्वच सणांवर कोरोनाचे सावट असल्याने प्रशासनाकडून विशेष नियमावली जाहिर करण्यात आली आहे. आरोग्याच्या सुरक्षेसाठी भक्तांना मंदिरात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पालिका, पोलीस प्रशासन याला कार्यकर्ते यांच्याकडून सहकार्य मिळत आहे.

दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे देवीला सोन्याची साडी परिधान केली जाते. कोरोनामुळे मंदिर बंद असले तरी देखील सोन्याची साडी परिधान केलेल्या देवीचे सुवर्णवस्त्रातील मनोहारी रुपाचे दर्शन भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने घेतले. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते, त्यामुळे या दिवसाला महत्व आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची ३७ जहाजं होर्मुझमध्ये अडकून, देशात कच्च्या तेलाचा साठा किती? खतांचे काय? पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितली आकडेवारी

Pune Land Action: शर्तभंग झालेल्या ३० भूखंडांवर सरकारची मोठी कारवाई; पुणे-पिंपरीत कोट्यवधींच्या जमिनी ताब्यात, २०० कोटींची मालमत्ता जप्त

Latest Marathi News Live Update : दिल्लीत 'क्वाड'च्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

देऊळ बंद २ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 5 दिवसात कमावले तब्बल 'इतके कोटी'

Chhatrapati Sambhajinagar: पैठणचे गोदापात्र पडले कोरडेठाक; घाण, कचरा सडून परिसरात दुर्गंधी; धार्मिक विधींना मोठा फटका

SCROLL FOR NEXT