Gold Sell eSakal
पुणे

Gold Sell : सोने खरेदीच्या उच्चांकाची गुढी! सराफ बाजारात उत्साह; ग्राहकांसाठी विविध ऑफर

Gudhi Padwa : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सराफ व्यावसायिकांनी दिलेल्या विविध ऑफरमुळे मंगळवारी सकाळपासूनच बाजारात गर्दी होती.

सकाळ वृत्तसेवा

Gold Sell on Gudhi Padwa : लग्नसराई आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांची मंगळवारी (ता. ९) संख्या वाढली. त्यामुळे सराफ बाजाराला मोठी झळाळी आली. गेल्या आठवड्यापासून सोने खरेदीसाठी झालेल्या गर्दीने मंगळवारी उच्चांक गाठला. अनेक ग्राहकांनी आधीच बुकिंग केले होते. त्यांनी गुढीपाडव्याला दागिन्यांची डिलिव्हरी घेतली.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सराफ व्यावसायिकांनी दिलेल्या विविध ऑफरमुळे मंगळवारी सकाळपासूनच बाजारात गर्दी होती. गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्या-चांदीच्या भावात वाढ होत आहे. त्यामुळे खरेदीसाठी थांबलेल्या अनेकांनी मंगळवारचा मुहूर्त साधला. लग्नासाठी आवश्‍यक असलेल्या दागिन्यांची सर्वाधिक विक्री झाली. त्यात गंठण, मंगळसूत्र, मिनी गंठण, बांगड्या, पाटल्या आणि अंगठ्यांचा समावेश आहे. गुंतवणूक म्हणून वेढणीलाही मोठी मागणी होती. लग्नसराई आणि भावात होणाऱ्या वाढीमुळे यंदा दागिन्यांची खरेदी जास्त झाली.

नऊ मार्चचे भाव

  • सोने २४ कॅरेट - ७१,७८१

  • सोने २२ कॅरेट - ६६,८०६

  • चांदी - ८२,१०० (प्रतिकिलो)

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आमच्या स्टोअरमध्ये सकाळपासूनच गर्दी व उत्साह दिसून आला. सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांना मोठी मागणी होती. दागिन्यांच्या किमतींमुळे उत्साह कमी झाला नाही. सकारात्मक वातावरण कायम होते. ग्राहकांनी लग्न समारंभ, गुंतवणूक आणि रोजच्या वापरासाठी दागिन्यांची खरेदी केली.

- डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स

गेल्या वर्षभरात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली; मात्र तरीही बाजारात खरेदीसाठी तेजी आहे. उन्हामुळे दुपारी प्रतिसाद थंडावला. सायंकाळी पुन्हा खरेदीसाठी उत्साह होता. सध्या ग्राहकांची वेढणी घेण्यापेक्षा दागिने खरेदीस पसंती असल्याचे दिसते. मुर्हूताला खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लग्नासाठीच्या दागिन्यांचीही खरेदी केली.

- अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स

गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी सोन्याची खरेदी करतो. त्यानुसार आम्ही मंगळवारीही सोने घेतले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या भावात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे माझ्या ठरलेल्या बजेटमध्ये कमी खरेदी झाली. सोन्याच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा झाला याचा आनंद आहे.

- अशोक जोशी, खरेदीदार

श्रीखंड, आम्रखंड, जिलेबीला जास्त मागणी होती, तसेच पेढे, बर्फी, गुलाबजामूनलाही मागणी होती. श्रीखंड खरेदीसाठी नागरिक दुकानात गर्दी करत आहे.

- श्रीपाद चितळे, चितळे बंधू मिठाईवाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT