पुणे

.

CD

सोन्याच्या विटा
दिल्लीत जप्त

नवी दिल्ली : सोने तस्करीविरोधात मोठी कारवाई करून सीमा शुल्क विभागाच्या गुप्तचर विभागाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून ३,५६५ ग्रॅमच्या ११५ सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या असून, त्याचे बाजारमूल्य ५.५ कोटी रुपयांहून अधिक आहे. आरोपीने आपल्या पँटच्या आतल्या बाजूला शिवलेल्या विशेष खिशांमध्ये हे सोने लपवले होते. सॅन फ्रान्सिस्कोहून ‘एअर इंडिया’च्या ‘एआय-४१७४’ या विमानाने हा प्रवासी नवी दिल्लीत आला होता. सीमा शुल्क विभागाला न कळवता बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आले. जप्त केलेले सोने २४ कॅरेट शुद्धतेचे आहे.

‘पोक्सो’ प्रकरणात
पीडितेचा जबाब

हैदराबाद : केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांचा मुलगा बंडी साई भगीरथ याच्याशी संबंधित ‘पोक्सो’ प्रकरणात महत्त्वाची घडामोड झाली आहे. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या पालकांचे जबाब मेदचल जिल्हा न्यायालयात नोंदवले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेदचल जिल्हा न्यायालयात पीडित मुलगी आणि तिच्या पालकांचा जबाब ४० मिनिटे नोंदवण्यात आला. या प्रकरणातील आरोपी भगीरथ याच्याविरोधात पोलिसांनी ‘लूक आउट’ नोटीस जारी केली असून, त्याच्या शोधासाठी पाच विशेष पथके तैनात केली आहेत. पोलिस सध्या ‘सीडीआर’ आणि ‘आयपी’ ॲड्रेसच्या माध्यमातून त्याचा शोध घेत आहेत.

‘जीएसटी’प्रकरणी
दोन जणांना अटक

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) तसेच मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने एका सनदी लेखापालासह दोघांना अटक केली आहे. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आणि विविध बँक खात्यांतून पैशांची अफरातफर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राजीवकुमार पराशर आणि चांदणी चौक येथील एका फर्मशी संबंधित सनदी लेखापाल अतुल गुप्ता अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात यशस्वी शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, शर्मा यांच्या मालकीच्या कंपनीची कागदपत्रे वापरून २८.४ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT