पुणे

बारामतीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

CD

बारामती, ता. १७ : माळावरची देवी मंदिराजवळ पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना १५ मे रोजी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी (ता. १६) फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी रेखा मारुती पवार (वय ६१, रा. बारामती) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे फिर्याद देण्यास उशीर झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादी पवार या पती मारुती पवार यांच्यासमवेत मोटारसायकलवरून इंदापूरकडे जात असताना रेखा पवार या माळावरची देवी मंदिराजवळ थांबल्या होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या, क्रमांक नसलेल्या मोटारसायकलवरून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील दोघांनी जळोची मार्केट यार्डचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना बोलण्यात गुंतवले. मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे पाच ग्रॅम वजनाचे, दोन सोन्याची मंगळसूत्रे हिसकावून पळ काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोर्टाचा FDAला दणका! पुण्यातील दुकानदाराला ५ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश,नेमकं प्रकरण काय?

World Padel League चे गेम चेंजर्स लायन्स ठरले पहिले चॅम्पियन! ऑसी मॅव्हरिक जॅग्वार्सचा फायनलमध्ये पराभव

Digras News : उबाठाकडून खासदार संजय देशमुखांना घरपोच नोटीस

Pune Grand Tour : सायकल स्पर्धेच्या निविदेत प्रशासन एक पाऊल मागे

Pune News : आमदार सुनील कांबळे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

SCROLL FOR NEXT