पंढरपुरात गोल्डन सिटी प्रकल्पाचा शुभारंभ
पंढरपूर, ता. ९ : येथील डीजे अॅन्ड जीएम मल्टिव्हेंचर प्रा. लि. अंतर्गत गोल्डन सिटी प्लॉट व रो-हाऊस या नवीन प्रकल्पाचा शुभारंभ मंगळवारी (ता. १०) सायंकाळी पाच वाजता होणार आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक दत्तात्रय जाधव व गणेश मलपे यांनी दिली.
पंढरपूर शहरापासून अगदी जवळ असलेल्या लोटस् स्कूलसमोरच्या जुन्या कासेगाव-पंढरपूर रोडलगत सोळा एकर परिसरामध्ये गोल्डन सिटी प्लॉट व रो-हाऊसेस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रकल्पातील सर्व प्लॉट कलेक्टर येणे करण्यात आले आहेत. गोल्डन सिटी प्रकल्पामध्ये अनेक मूलभूत व नागरी सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये रोडलाईट, अंडरग्राउंड ड्रेनेज, ९ व १२ मीटरचे अंतर्गत डांबरी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाडे, प्रीकॉस्ट वॉल कंपाउंड, लहान मुलांसाठी गार्डन व नाना-नानी पार्क आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
शुभारंभाच्या निमित्ताने ‘गर्जा महाराष्ट्र’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुभारंभाच्या दिवशी भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आकर्षक भेट वस्तू देखील देण्यात येणार आहे. याशिवाय चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती ही प्रकल्प संचालक गणेश मलपे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.