Meteor-showers 
पुणे

उल्कावर्षाव पाहण्याची सुवर्णसंधी; १२आणि १३डिसेंबरच्या मध्यरात्री दिसणार विलोभनीय दृश्‍य

सकाळवृत्तसेवा

पुणे - डिसेंबर महिन्यामध्ये ‘मिथुन राशी’मधून दिसणारा उल्कावर्षाव ही खगोलप्रेमींसाठी नामी सुवर्णसंधीच. या वर्षी १२ आणि १३ तारखेच्या मध्यरात्री या उल्कावर्षावाने परमोच्च बिंदू गाठलेला असेल त्यामुळे आकाशनिरीक्षणासाठी ही योग्य वेळ असल्याचे खगोलनिरीक्षक अमित पुरंदरे यांनी सांगितले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘मिथुन राशीचा उल्कावर्षाव’ किंवा ‘जेमिनिडस’ नावाने खगोलप्रेमींमध्ये परिचित या उल्कावर्षावाचा शोध १८६२ मध्ये लागला होता. तेव्हापासून डिसेंबर महिन्यात नियमितपणे हा उल्कावर्षाव दिसतो. मागील काही वर्षांच्या निरीक्षणांप्रमाणे १२ आणि १३ तारखेला सर्वांत जास्त उल्का दिसतात. या दोन्ही दिवशी चंद्रोदय पहाटे असल्यामुळे मिथुन राशीमधील हा उल्कावर्षाव प्रेक्षणीय दिसणार आहे. लॉकडाउनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कुटुंबासोबत अशा रोमांचकारी खगोलीय घटनेचे साक्षीदार होण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. 

तासाला ७० ते १०० उल्का  
उल्कावर्षावासाठी प्रामुख्याने धूमकेतू कारणीभूत असतात, मात्र हा उल्कावर्षाव त्याला अपवाद असून ३२०० फेटन नावाच्या लघुग्रहामुळे हा होतो. 
अंतराळात विखुरलेल्या लघुग्रहाच्या कचऱ्यामधून दरवर्षी डिसेंबर महिन्यात पृथ्वीचे भ्रमण होते. त्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीत येणाऱ्या या कचऱ्यामुळे आपल्याला मिथुन राशीमधून उल्कावर्षाव दिसतो. 
तासाला ७० ते १०० उल्का दिसू शकतात, तर चंद्र नसल्यास हीच संख्या १६० पर्यंत जाऊ शकते.

असे करा आकाशनिरीक्षण  
    आकाशनिरीक्षणासाठी प्रकाशाचे प्रदूषण कमी असणारी अंधारी जागा निवडावी. शहरातून शक्‍यतो कमीच उल्का दिसतील
    १२ आणि १३ तारखेला रात्री नंतरची वेळ योग्य राहील. साधारणतः दीड वाजता मिथुन रास या दोन दिवशी डोक्‍यावर असेल. आकाशात मिथुन रास शोधण्यासाठी सोबतच्या चित्राचा आधार घ्या. 
    उघड्या डोळ्यांनी उल्कावर्षाव पाहणे योग्य, द्विनेत्री (बायनॉक्‍यूलर) असल्यास धूसर उल्काही दिसतील 
    मिथुन रास डोक्‍यावर असेल अशावेळी झोपून आकाशाचे निरीक्षण करावे. म्हणजे २७० अंश आकाश दृष्टिकोनात येईल. 
    थंडी आणि डासांच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नोंदी घेण्यासाठी ‘आयएमओ’चा फॉर्म   
जगभरातील हौशी खगोलप्रेमी उल्कांची नोंद घेत असतात. तुम्हीही उल्कावर्षाव पाहताना अशा नोंदी घेऊ शकतात. यासाठी आंतरराष्ट्रीय उल्का संस्थेने (आयएमओ) एक विहित नमुना/फॉर्म दिला असून त्यावर सविस्तर माहिती द्यायची आहे. अर्जाच्या ऑनलाइन लिंकसाठी शेजारचा क्‍युआर कोड स्कॅन करा आणि खगोलनिरीक्षक बना. या नोंदी घेत असताना एक सहकारी सोबत असावा, जेणेकरून तो टाईमकिपर म्हणून मदत करेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT