पुणे

न्यु इंग्लिशचे स्नेहसंमेलन

CD

गोंदवलेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

गोंदवले, ता. ३ : येथील सांगली शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर इंडियन कल्चर या थीमवर आधारित विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाने उपस्थित भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये सादर केलेल्या श्लोक पठणाने उपस्थित अवाक्‌ झाले होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ग्राहक न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अनिल गोडसे होते, तर अध्यक्षस्थानी अनिल गोडसे उपस्थित होते. यावेळी उद्योगपती रामदास माने, श्री शांतिगिरी महाराज इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक दादा जगदाळे, प्राचार्य अभिमन्यू माने, सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने, गुरुदत्त कुलकर्णी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

निवृत्त न्यायाधीश गोडसे म्हणाले, ‘‘इंग्रजी हे वाघिणीचे दूध असून, हे दूध पीत असल्याने भविष्यात न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीत. या शाळेत मिळणाऱ्या संस्कारमूल्य शिक्षणामुळे विद्यार्थी हा उच्चशिक्षितच नव्हे, तर सुसंस्कारी माणूस म्हणून समाजाला नक्कीच दिशा देईल. यावेळी रामदास माने, दादा जगदाळे आदी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन भागवत यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया भागवत यांनी आभार मानले.
-------------------------------
02581
गोंदवले बुद्रुक : वार्षिक स्नेहसंमेलनात कलागुणांचे सादरीकरण करताना विद्यार्थी. (फिरोज तांबोळी : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iran-israel conflict: होर्मुझमध्ये ७०० तेल टँकर अडकले! जगात तेल संकटाची भीती; भारताकडे किती दिवसांचा साठा?

Jalna–Jalgaon Project : जालना-जळगाव रेल्वेचा मार्ग मोकळा! ५,८०४ कोटींचा निधी मंजूर; लवकरच भूसंपादन सुरू

Team India Schedule: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचे वेळापत्रक; अफगाणिस्ताननंतर कोणकोणत्या संघाला भिडणार, घ्या जाणून

Mahur News : माहूरमध्ये वाळू माफियांची मुजोरी! पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून गेले; टिपर मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : ग्रहण काळात मंदिरे बंद ठेवण्याची पौराणिक काळापासून परंपरा, जळगावमधील शेकडो मंदिरे बंद

SCROLL FOR NEXT