पुणे

गोंदिया-जबलपूर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण ५,२३६ कोटींचा खर्चाला मंजुरी; पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २४ : पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणासाठी केंद्र सरकारने एकूण १२,२३६ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना आज मंजुरी दिली. यामध्ये महाराष्ट्राशी संबंधित गोंदिया-जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीतील निर्णयांवर आर्थिक व्यवहारविषयक समितीने शिक्कामोर्तब केले. ‘सेवातीर्थ’ या नव्या कार्यालयात झालेली ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होती.
माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले,‘‘महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या चार राज्यांतील आठ जिल्ह्यांत रेल्वे प्रकल्प राबविले जाणार आहेत. गोंदिया-जबलपूर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासह पुनारख-किऊल तसेच गम्हरिया-चांडिल मार्गांवर तिसरी व चौथी रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा फायदा गोंदिया जिल्ह्याला तर मध्य प्रदेशातील जबलपूर, मंडला, सिवनी आणि बालाघाट या जिल्ह्यांना होईल.’’ याखेरीज विदर्भातील कान्हा राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान आणि कचनार शिव मंदिर यासारख्या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे सुलभ होणार असल्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

विमानतळाचा विस्तार
काश्मीरमधील श्रीनगरच्या विमानतळाच्या विस्तारीकरणाचाही निर्णय केंद्र सरकारने घेतला असून याअंतर्गत श्रीनगर येथे १,६६७ कोटी रुपयांच्या खर्चाने अत्याधुनिक इंटिग्रेटेड विमानतळ टर्मिनल उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे श्रीनगर विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता ३० लाखांवरून एक कोटीपर्यंत वाढणार आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे ऊर्जा क्षेत्राची कार्यक्षमता व आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी उर्जा क्षेत्रातील सुधारणांनाही मंजुरी मिळाली आहे. यानुसार पॉवरग्रिड कंपनीला आता आपल्या सहाय्यक कंपन्यांमध्ये प्रति प्रकल्प ७,५०० कोटी रुपयांपर्यंत इक्विटी गुंतवणूक करता येणार आहे. तसेच कच्च्या ज्यूटसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निश्चित करण्यात आली आहे. यासाठी ४३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गोंदिया-जबलपूर दुहेरीकरण...
ाअपेक्षित खर्च : ५,२३६ कोटी रुपये
पूर्तता कालावधी : पाच वर्षे
जोडले जाणारे मार्ग : गोंदियाजवळ हावडा–मुंबई हायडेन्सिटी नेटवर्क आणि जबलपूर येथे इटारसी–वाराणसी मार्ग
फायदा : वाराणसी व प्रयागराजहून चेन्नई, बंगळूर आणि हैदराबादकडे जाण्यासाठीचा सर्वांत जलद व कमी अंतराचा मार्ग ठरणार (२९२ किमी अंतराची घट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT