Farmer Media Gallery
पुणे

खूशखबर! शेतकऱ्यांना मिळणार तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज (interest free loan) मिळणार आहे. एक ते तीन लाखांच्या कर्ज मर्यादेत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास ही सवलत देण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. (Good news Farmers will get interest free loan up to Rs 3 lakh)

मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे राज्य सरकारची व्याज दर सवलत तीन टक्के आणि केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत या दोन्हीचा एकत्रित फायदा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.

व्याज दरात आणखी दोन टक्के सवलत मिळणार

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. या योजनेत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३ टक्के व्याज सवलत देण्यात येत होती. एक लाख ते तीन लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत व्याज दरात एक टक्का सवलत देण्यात येत होती. आता एक ते तीन लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास त्यांना व्याज दरात आणखी दोन टक्के सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

शेती उत्पादन वाढ होईल

या निर्णयामुळे कृषी उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे खरेदी करता येणार आहेत. यातून शेती उत्पादनात वाढ होईल. तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील. त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Mhatre: महिला डॉक्टरला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! नगरसेवक रमेश म्हात्रेंना अखेर अटक; व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची कारवाई

Maharashtra Politics: शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये जाणार? BJP आणि NCP च्या दोन बड्या नेत्यांमध्ये भेट; नव्या समीकरणांची चर्चा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची टीम आली अन् स्वीट होममध्ये आढळला मृत उंदीर; तात्काळ परवाना रद्द, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?

जुई गडकरीने सुरू केलं नवं काम; अभिनयासोबत आता 'या' नव्या प्रवासालाही केली सुरुवात

Latest Marathi News Live Update: वेळ नदीला महापूर, पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाहतूककोंडी

SCROLL FOR NEXT