पुणे

‘गुड टच आणि बॅड टच’विषयी जनजागृती आवश्यक : कोल्हे

CD

पिंपळवंडी, ता. ९ : ‘‘ग्रामीण व शहरी भागांतील सर्व शाळांमध्ये ‘गुड टच आणि बॅड टच’ याविषयी योग्य व शास्त्रीय माहिती देऊन जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांमध्ये आणि एकंदरीत समाजामध्ये संशयास्पद हालचालींविषयी खबरदारी घेण्यासाठी प्रबोधन होणे काळाची गरज आहे,’’ असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
जुन्नर तालुक्यातील साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी घडली होती. खासदार डॉ. कोल्हे यांनी बुधवारी (ता. ९) पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच, पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर
प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या नराधमाला लवकरात लवकर फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. या घटनेच्या पहिल्या दिवशीपासून पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या सतत संपर्कात आहे. ज्याप्रमाणे नसरापूर येथील गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तशीच कडक शिक्षा याही आरोपीला मिळाली पाहिजे. आरोपीला फाशीपर्यंत पोहोचवता येईल, अशाच भक्कम पद्धतीने ही केस न्यायालयात उभी राहिली पाहिजे, ही माझी सुरुवातीपासूनच भूमिका आहे. त्या नराधमाला प्रत्यक्ष फाशीची शिक्षा होऊन त्याची अंमलबजावणी झाल्यासच खऱ्या अर्थाने पीडिताला पूर्ण न्याय मिळेल. पुढील न्यायालयीन लढ्यात आणि पाठपुराव्यामध्ये मी कुटुंबासोबत आहे. अशा विकृत घटना घडू नयेत, यासाठी समाजात मोठ्या बदलांची गरज आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT