Google 
पुणे

गुगलवरील पत्ता आरटीईसाठी कन्फर्म असावा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - आरटीई प्रवेशांतर्गत ऑनलाइन फॉर्म भरताना ‘गुगल’वर घराचा पत्ता चुकीचा दर्शविला जात असल्याने पालकांनी अर्ज ‘कन्फर्म’ करताना पत्ता योग्य असल्याची खात्री पालकांनी करावी. अन्यथा पाल्यांना प्रवेश मिळण्यास अडसर निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जामध्ये शाळांची निवड करताना तीन किलोमीटरच्या आतील शाळा निवडणे बंधनकारक आहे. मात्र अर्ज करताना ‘गुगल पत्ता’ या रकान्यात शहरातील ठराविक ठिकाणांची नावे येत नाहीत. विद्यार्थ्यांचे शाळेपासूनचे घरापर्यंतचे अंतर गुगल मॅपने निश्‍चित केले असल्याने भौगोलिक परिस्थितीनुसार तफावत येत असल्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे पालकांना ‘लोकेशन सिलेक्‍ट’ करणे कठीण जात असून, गुगल मॅपवरील अंतरामध्ये अक्षांश व रेखांश चुकीचा दिल्यामुळे पत्त्याचे ठिकाण जुळत नाही. सरकारकडून अर्जाची गुगल पडताळणी (व्हेरिफिकेशन) अट लागू केली आहे. 

या पडताळणीमध्ये चुकीचा पत्ता दाखविल्यावर पाल्यांचा अर्ज बाद होऊ शकतो. ज्या पालकांकडून अनवधानाने अर्जामध्ये चुकीचा पत्ता दाखविला असेल, त्यांनी महापालिका प्रशासनाकडे दुरुस्तीसाठी विनंती अर्ज करावा. 

याबाबत आरटीई पालक संघाचे अध्यक्ष हेमंत मोरे म्हणाले, ‘‘तांत्रिक अडचणींमुळे चुकीचा पत्ता नोंद होत असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत बाधा येण्याची शक्‍यता आहे. गुगलवरील पत्ता दुरुस्त करून मिळण्याबाबत शिक्षण विभागाकडे अर्ज केला आहे.

गुगल मॅपवरून पत्ता चुकत असल्याबाबत काही पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत पालकांकडून दुरुस्तीबाबतचे विनंती अर्ज घेत आहोत.
- हैबती मोरे, आरटीई समन्वयक, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flower Market: झेंडूच्या फुलांनी बाजार बहरला! दसऱ्यामुळे पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात झेंडूची मोठी आवक; किलोला ३० ते ७० रुपये भाव

Panvel-Karjat Local: दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत, पनवेल-कर्जत मार्गाला गती; डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

Food Inflation: दिवाळीनंतर साबण-बिस्किटांचे दर वाढणार? पार्ले कंपनीने दिला इशारा; साखर, खाद्यतेलाचं काय होणार?

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ' मतमोजणीला सुरुवात; राधानगरी तालुक्यात पहिल्या 25 मतपत्रिकांपैकी नऊ मतपत्रिकांवर पॅनेल टू पॅनेल मतदान

Gokul Milk Union Election : गोकुळच्या मतमोजणीत क्रॉस व्होटिंगचा मोठा बॉम्ब!; राधानगरीत पहिल्या २५ मतपत्रिकांमध्ये ६४ टक्के क्रॉस व्होटिंग

SCROLL FOR NEXT