PayTM-and-G-Pay 
पुणे

गुगल पे, पेटीएम केल्यास एस्ट्रा पैसे द्यावे लागणार; पूर्व हवेलीतील दुकानदारांचा ग्राहकांना झटका

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर - पूर्व हवेलीतील नागरिकांना गुगल पे, पेटीएम यांसारख्या युपीआय प्लॅटफॉर्मवरुन बिल भरायचं असल्यास आता अधिक सहा रुपये द्यावे लागणार आहेत. होय, इथल्या छोट्या दुकानदारांनी असा निर्णय घेतला आहे. तसेच जर ग्राहक हे अधिकचे पैसे द्यायला तयार नसल्यास दुकानदार रोख स्वरुपात पैसे देण्याची मागणी करत आहेत. याबाबतचे फलकच या दुकानदारांनी आपल्या दुकानात लावले आहेत.

गुगलपे, पेटीएमच्या माध्यमातून हॉटेल, चहा, पानटपरींवर बिलाचे पैसे घेण्याचा आग्रह धरल्यास, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील अनेक दुकानदारांनी सहा रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील असे फलकच दुकानात लावले आहेत. यामुळे ग्राहकांची गैरसोय झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, असं का घडलंय हे जाणून घेतल्यास कळलं की, गुगल पे, पेटीएमद्वारे ज्या दुकानदारांनी ग्राहकांकडून पैसे स्विकारले त्या व्यावसायिकांच्या बॅंक खात्यातून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील युनियन बॅंकेने लेजर प्रिंटच्या नावाखाली प्रतिव्यवहार पाच रुपये नव्वद पैसे परस्पर वसूल केले आहेत, दोन दिवसांपूर्वी सकाळनेच ही बाब समोर आणली होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वच राष्ट्रीयकृत बँकांकडून शुल्क वसूली?
त्यानंतर लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीमधील अनेक व्यावसायिकांनी आपआपल्या बॅंकेत जाऊन या व्यवहारांबाबत खात्री केली असता केवळ युनियन बॅंकेनेच नव्हे तर सर्वच राष्ट्रीयकृत बॅंकांनी युपीआयच्या माध्यमातून पैसे स्विकारलेल्याव्यावसायिकांच्या बॅंक खात्यातून सहा रुपये वसूल केल्यास समोर आलं आहे. यामुळे आता अनेक व्यावसायिकांनी रोख स्वरुपातच पैसे स्विकारण्यास सुरुवात केली आहे.

...तर एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागेल
या प्रकाराबाबत माहिती देताना लोणी स्टेशन येथील हॉटेल व्यावसायिक प्यारे उर्फ कृष्णा कोटीयान म्हणाले, "मागील वर्षभरापासून आम्ही चहाची दहा रुपये तर वडापावची बारा रुपये या किंमतींना विक्री करत आहोत. या ठिकाणी एमआयटी या शिक्षण संस्थेचे बहुतांश ग्राहक असल्याने चहा, वडापाव अथवा इतर पदार्थांचे पैसे विद्यार्थी डीजिटल माध्यमातून देत होते.

मात्र, चार दिवसांपूर्वी माझ्यासह अनेक दुकानदारांच्या खात्यातून प्रतिव्यवहार सहा रुपये बँकांनी कापून घेतल्याने आम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. यामुळे आता बिलाचे पैसे रोख स्विकारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र, एखाद्या ग्राहकाला जर गुगल पे किंवा पेटीएमद्वारे पैसे द्यायचे असतील तर संबधित ग्राहकाकडून एक्स्ट्रा सहा रुपये घेण्यात येणार आहेत."

चहा विक्रेत्यांना मोठा फटका...
पूर्व हवेलीत अनेक चहा विक्रीची साखळी दुकानं सुरु झाली आहेत. या व्यवसायात स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. विक्रेत्यांना एक कप चहा बनविण्यासाठी सरासरी सहा ते साडेसहा रुपये खर्च येतो. तर एक कप चहाची विक्री सरासरी दहा रुपयांना केली जाते. यामुळे चहा विक्रेत्याला चहाच्या एका कपापोटी साडेतीन रुपयांचा फायदा होतो. जर एक कप चहाचा फायदा साडेतीन ते चार रुपये असेल आणि चहाचे बिल युपीआयच्या माध्यमातून स्विकारल्यास दुकानदाराला पाच रुपये नव्वद पेशाचा भुर्दंड पडतो आहे. हे उघडपणे नुकसान असल्याने चहा विक्रेत्यांनीही चहाचे बिल रोख स्वरुपात स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT