Gopichand Padalkar sakal
पुणे

Gopichand Padalkar: अजित पवार सत्तेत येताच पडळकरांनी कार्यकर्त्यांना केल्या सूचना; सत्तेत आले तरी बारामतीत...

Maharashtra Politics Update : `बारामतीचे अजितदादा भाजपबरोबर आले आणि उपमुख्यमंत्री झाले, त्याबद्दल आनंदच आहे. परंतु बारामतीच्या भाजपच्या नेतेमंडळींनी अथवा कार्य़कर्त्यांनी पक्षवाढीचे काम थांबवायचे नाही.

कल्याण पाचांगणे

Malegaon News - `बारामतीचे अजितदादा भाजपबरोबर आले आणि उपमुख्यमंत्री झाले, त्याबद्दल आनंदच आहे. परंतु बारामतीच्या भाजपच्या नेतेमंडळींनी अथवा कार्य़कर्त्यांनी पक्षवाढीचे काम थांबवायचे नाही.

बारामती विधान सभा मतदार संघ निवडणूक प्रमुखांसह कार्य़कर्त्यांनी पंतप्रधान मोदीसाहेबांचे ९ वर्षाचे जनहिताचे कार्य़ बारामतीकरांच्या घरोघरी पोचवावे. भाजप पक्ष नक्की तुमच्या कामाची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही,` असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी शारदानगरच्या सभेत व्यक्त केला.

शारदानगर (ता.बारामती) येथील अजून मंगल कार्य़ालयामध्ये रविवारी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, सुनिल माने यांच्या पुढाकारातून भाजप कार्य़कर्ता मेळावा घेतला होता. त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे, बारामती विधान सभा मतदार संघ निवडणूक प्रमुख रंजन तावरे, तालुकाध्यक्ष पांडूरंग कचरे, शहराध्यक्ष सतिश फाळके, मच्छिंद्र टिंगरे, सुधिर पांढरे, राजेंद्र कांबळे,  संतोष देवकाते, सुनिल माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि सरकारमध्ये बदलते वातावरण विचारात घेता भाजपच्या कार्यकर्त्यांनी कसलीही हतबलता दाखवाची नाही, असे सांगून आमदार पडळकर म्हणाले,``मोदीसाहेब आणि देवेंद्र फडणविस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आदी भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी महाराष्ट्रातील जनतेच्या हिताच्या दुष्टीने योग्यतो निर्णय घेतला आहे.

त्यामुळेच अजितदादा व त्यांचे राष्ट्रवादीमधील बहुतांशी आमदार शिंदे-फडणविस सरकारमध्ये सहभागी झाले. ही प्राप्त स्थिती विचारात घेता भाजपच्या कार्य़कर्त्यांनी निष्ठेने मोदीसाहेबांचे कार्य़ अधिक जोमाने बारामतीकरांच्या घराघरात पोचवावे,` असे आवाहन त्यांनी केले.

पायाभूत सुविधांचा अभूतपुर्व विकास, सशक्त शेतकरी..समृद्ध भारत, निरोगी जीवन प्रत्येकाचा हक्क आदी मुद्यांच्या आधारे केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमूक योजनांची माहिती पडळकर यांनी उपस्थितांना दिली.

तत्पुर्वी रंजन तावरे यांनीही अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याचे स्वागत केला व  कार्य़कर्त्यांना नाउमेद होऊ नका असे सांगितले. सतिश फाळके, राजेंद्र कांबळे यांनी स्थानिक लोकांच्या सर्वजनिक प्रश्नांकडे नेतेमंडळींचे लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT