टुडे एकसाठी अँकर
फोटो - PNE26W44599
बेंगळुरू ः अहिल्यानगरचे गोरक्षनाथ वैरागर यांचा सन्मान करताना आर्ट आॅफ लिव्हिंगचे गुरुदेव श्रीश्री रविशंकर. समवेत प्रशिक्षक पद्माकर कुलकर्णी.
बाह्य अन् अंर्तमन स्वच्छतेचा जागर
गोरक्षनाथ वैरागर यांची २५ वर्षांची तपश्चर्या; घरोघरी मोफत कचरा संकलन
मुरलीधर कराळे
सकाळ वृत्तसेवा
अहिल्यानगर, ता. २४ ः अहिल्यानगरमध्ये घरोघरी घंटा गाडीची संकल्पना २५ वर्षांपूर्वीच राबविणारा अवलिया एका ट्विटमुळे जगभर पोचला आहे. आर्ट आॅफ लिव्हिंगचे गुरुदेव श्रीश्री रविशंकर यांनी नगरच्या गोरक्षनाथ वैरागर यांचे कार्य एक्सवर शेअर केले आहे. त्यानिमित्ताने अहिल्यानगर शहराचे नाव करोडो साधकांपर्यंत पोहोचले.
सिद्धार्थनगरमध्ये राहणारे वैरागर यांनी गेल्या २५ वर्षांपूर्वी शहरात मोफत कचरा संकलनाचे काम सुरू केले. त्यावेळी शहरात कचऱ्याची समस्या मोठी होती. घरोघरी येणारी घंटागाडी ही संकल्पनाही नव्हती. ते स्वतः दारोदारी फिरून कचरा संकलन करीत. दूरवर असलेल्या कचराकुंडीत तो टाकत किंवा जाळून टाकत. तत्कालीन नगरसेवक अनंत जोशी यांनी त्यांना एक ‘घंटा ट्रॉली’ दिली. ही ट्रॉली शहरात फिरविताना लोकं त्यांना घरातील कामे देऊ लागले. परिसर साफसफाई, नालेसफाई, प्रांगणातील गवत काढणे, घरगुती कामे ते करीत. त्याचे त्यांना थोडे पैसे मिळत. त्यांची पत्नी (कै.) मंगल याही धुणी-भांडी धुण्याची कामे करीत. हीच सेवा व त्यातून मिळणाऱ्या किरकोळ रकमेवर त्यांचे कुटुंब चालत. नगरमधील वृंदावन सोसायटी, भिडे चौक, रासनेनगर, कुष्टधाम, पोलिस कॉलनी, तारा कॉलनी, तसेच शहरातील इतर अनेक भागांत त्यांनी कचरा संकलन केले. इमानदारी, देतील त्या मोबदल्यात कामे करणे, प्रत्येकाशी प्रेमळ बोलणे यामुळे या परिसरातील घराघरांत ते परिचित आहेत. हे करीत असतानाच ते गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून आर्ट आॅफ लिव्हिंगशी जोडले गेले. प्राणायाम, योगासने शिकले. सुदर्शनक्रिया शिकले. सध्या रोज पहाटे साडेतीन वाजता उठतात. योगा, प्राणायाम करतात. प्रत्येक रविवारी ज्ञानमंदिरात जाऊन सुदर्शन क्रिया करतात. रोज दिवसभर शहराअंतर्गत सुमारे २५ किलोमीटर ट्रॉली घेऊन पायपीट करतात. त्यांना पाच मुली व दोन मुले आहेत. मुलींचे लग्न झाले. मुलेही कंपनीत कामे करतात.
आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रशिक्षक पद्माकर कुलकर्णी यांनी गोरक्षनाथ यांच्याविषयी थेट गुरुदेव श्रीश्री रविशंकर यांना माहिती दिली. त्यांचा व्हिडिओ दाखविला. गुरुदेवांनी त्यांना भेटायला बोलावले. त्यांचा सन्मान केला. गुरुजींशी झालेली भेट म्हणजे गोरक्षनाथ यांचा जीवनातील अतिआनंदाचा क्षण ठरला. एवढेच नव्हे, तर गुरुजींनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून गोरक्षनाथ यांचे कार्य फोटोसह पोस्ट केले. त्यानिमित्ताने हे कार्य सातासमुद्रापार पोहोचले आहे.
इन्फो
....
महापालिका दखल घेणार
गोरक्षनाथ यांच्या कार्याची दखल महापालिका घेणार आहे. २७ आॅगस्टपासून सफाई कर्मचाऱ्यांसाठी नवचेतना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये योगा, प्राणायाम शिकविले जाणार आहे. यावेळी गोरक्षनाथ त्यांचे अनुभव सांगणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.