gosavi couple affected pune sinhagad road flood monsoon rain financial crisis Sakal
पुणे

Pune Flood Update : डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान

मी स्वयंपाकाची कामे करते आणि माझे पती चित्रपट किंवा इतर माध्यमांतून मिळतील तशा छोट्या भूमिका करतात.

सकाळ वृत्तसेवा

सिंहगड रस्ता : मी स्वयंपाकाची कामे करते आणि माझे पती चित्रपट किंवा इतर माध्यमांतून मिळतील तशा छोट्या भूमिका करतात. दोघांच्या जेमतेम उत्पन्नातून आमचे अर्थार्जन होते. त्यात पुराच्या पाण्याचा असा फटका बसल्याने नवीन संकट उभे राहिले आहे, अशी भावना ६७ वर्षीय विद्या गोसावी यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

विठ्ठलवाडीतील बैठ्या दोन खोलांच्या घरात विद्या गोसावी आणि त्यांचे पती मुकुंद गोसावी (वय ७५) हे ज्येष्ठ दांपत्य राहते. दुर्दैवाने त्यांच्या दोन्हीही मुलांचे अकाली निधन झाले. रविवारी नदीपात्रात पाणी सोडले होते.

मात्र त्यांच्या घरात विठ्ठलवाडीतून वाहत असलेल्या ओढ्यामुळे पाणी शिरले. ओढ्यावरील अतिक्रमणे, त्यातून पाण्याचा निचरा कमी होणे, परिणामी सांडपाणी वाहिन्यांवर ताण येणे या सगळ्यातून फुगवटा निर्माण होऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरते.

तेच पाणी गोसावी यांच्या घरात शिरले. विद्या गोसावी या सकाळीच घराबाहेर पडल्या होत्या. स्वयंपाकाची कामे करून त्या दुपारी दोन वाजता घरी परतल्या. तेव्हा त्यांच्या घरात गुडघाभर पाणी होते. घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उघडू शकला नाही. अथक प्रयत्नांनी त्यांनी दरवाजा उघडला.

मात्र पुराच्या पाण्यात घरातील पलंग, कपडे धुण्याचे मशीन आणि इतर साहित्य बुडाले होते. ती रात्र त्या दोघांनी शेजारीच असलेल्या एका कंपनीच्या कार्यालयात काढली. योग्य नियोजन नसल्यामुळे या भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. नदीपात्रात पाण्याचा फुगवटा निर्माण होऊ नये, म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT