MPSC student missing 
पुणे

Pune: 'मला मंत्रालयात नोकरी लागली', घरी फोन करून सांगितलं; पुण्यात MPSC करणारा तरूण बेपत्ता

Pune MPSC student missing: बुद्धभूषण पठारे असे या २४ वर्षीय बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

Pune: पुण्यात MPSC करणारा विद्यार्थी ३ महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. पालकांना मंत्रालयात नोकरी लागल्याचे खोटे सांगून पुण्यातून तरुण बेपत्ता झाल्याचं कळत आहे. बुद्धभूषण पठारे असे या २४ वर्षीय बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धभूषण पठारे मूळचा वैजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा आहे. गेल्या ४ वर्षांपासून तो पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. पुण्यातील गांजवे चौक परिसरातील एका इमारतीत तो त्याच्या मित्रांसोबत होता. तसेच नवी पेठेतील एका अभ्यासिकेत तो अभ्यास सुद्धा करायचा.

अचानक मे महिन्यात त्याने त्याच्या पालकांना त्याला मंत्रालयात नोकरी मिळाली असल्याचे सांगितले. हे ऐकून त्याचे पालकांनी मुंबई गाठली खरी मात्र तिथे गेल्यावर त्याचा मोबाईल बंद लागला. यानंतर त्याच्या वडिलांनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. काही दिवसांपूर्वी मात्र अचानक त्याच्या मोबाईल वरून त्याच्या पालकांना एक व्हॉट्सॲप मेसेज करण्यात आला, ज्यामध्ये मी सध्या डिप्रेशन मध्ये गेल्याचा उल्लेख केला आहे

यामुळे नेमका हा तरुण गेला कुठे, कोणाच्या संपर्कात तो आहे का? त्याचे कोणाशी काही वाद झाले का, याच बरोबर त्याच्याशी कोणी आर्थिक व्यवहार केले का असा संशय पोलिसांना आहे. अधिक तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Farmer Loan Waiver : 30 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 204 कोटींची कर्जमाफीची रक्कम जमा; चौथ्या यादीत 8 हजार जणांचा समावेश, 'आधार' प्रमाणिकरण पूर्ण करणे गरजेचे!

‘बिखरेगा जलवा’! म्हणत श्रद्धा कपूरने 'ईठा' सिनेमातील क्लिप केली शेअर! नाना पाटेकरांची सुद्धा महत्त्वाची भूमिका?

US Fed Rate: अमेरिकन फेडचा व्याजदराबाबत निर्णय! शेअर बाजारापासून सोन्या-चांदीपर्यंत काय परिणाम होणार?

Latest Marathi News Update : कुणाल मार्केट इमारतीत भीषण आग; 17 दुचाकी, 4 चारचाकी जळून खाक

Pandharpur Corridor: पंढरपूर कॉरिडॉरच्या भूसंपादनाला सुरुवात! निवासी जागेला २० हजार, व्यावसायिक जागेला ४० हजारांची तरतूद

SCROLL FOR NEXT