Pune University
Pune University Sakal
पुणे

पदवी तर मिळाली, पण प्रमाणपत्र कधी मिळणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (pune University) २०१९-२० अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्यानंतर मार्च-एप्रिल महिन्यात पदवी प्रदान समारंभ (Graduation Ceremony) घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, लॉकडाउनमुळे (Lockdown) नियोजन बिघडले असले तरी मे महिन्याचा अर्धा महिना संपला तरी विद्यापीठाने पदवीप्रदान कधी करणार हे स्पष्ट केलेले नाही. नोकरी तसेच परदेशात शिक्षणासाठी (Foreign Education) प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रवेश प्रमाणपत्राअभावी (Certificate) लटकले आहेत. (got degree but when will I get the certificate pune university)

कोरोनामुळे पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या होत्या. त्या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर महिन्यात जाहीर करण्यात आला. विद्यापीठाकडून निकाल लावण्याची प्रक्रिया सुरू असताना ज्या विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर यासह अन्य अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या प्रवेश परीक्षा देऊन, त्यात उत्तीर्ण होऊन गुणपत्रिकेच्या आधारे प्रवेश निश्‍चीत केला आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विद्यापीठाने डिसेंबर महिन्यात पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यास सुरवात केली होती. पण विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका उपलब्ध झाल्याशिवाय अर्ज भरता येत नसल्याने ३१ जानेवारीपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. विद्यापीठाकडे १ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्ष कार्यक्रम घेऊन पदवी प्रदान करणे शक्य नाही, त्यामुळे यंदाही विद्यापीठाला ऑनलाइन कार्यक्रमच घ्यावा लागणार आहे. अर्ज भरून घेताना मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदवी समारंभ होईल अशी शक्यता वर्तवली जात होती.

पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभास विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर परिणाम होत आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित कार्यक्रम घ्यावा.

- ज्ञानंद कदम, सचिव, युवासेना, पुणे विद्यापीठ युनिट

पदवी प्रमाणपत्रासाठी १ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २४ एप्रिल रोजी पदवी प्रदान समारंभ होणार होता; पण लॉकडाउनमुळे तो रद्द करावा लागला आहे.

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT