पुणे

वंचितांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे

CD

वंचितांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे

शिवेंद्रसिंहराजे; भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विविध उपक्रम

सातारा, ता. १७ : कातकरी, गोसावी, पारधी आदी वंचित घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आजपासून एका नव्या उपक्रमाची सुरुवात होत आहे. शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यांना योजनांची माहिती मिळाली पाहिजे आणि समाजातील प्रत्येक घटक मुख्य प्रवाहात आला पाहिजे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त शासनाच्‍या वतीने सातारा पंचायत समिती येथे कातकरी, गोसावी, पारधी समाजातील नागरिकांना आधार कार्ड, शासकीय योजनांची कागदपत्रे वाटप, आरोग्य शिबिर उत्साहात झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य कामेश कांबळे, सर्जेराव सावंत, पूजा मोरे, पंचायत समितीचे सभापती महेश गाडे, उपसभापती सुषमा जाधव, सदस्य राहुल शिंदे, प्रभाकर पवार यांच्यासह सर्व सदस्य प्रांताधिकारी आशिष बारकुल आदी उपस्‍थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांचा लाभ अपेक्षित प्रमाणात संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही.’’ अनेकदा योजनांची माहिती नसल्याने किंवा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने नागरिक लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे केवळ योजना जाहीर करून चालणार नाही, तर त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्‍याचे मत नोंदवले.
...............
66186
सातारा : वंचित समाज घटकांना कागदपत्रे वितरण करताना शिवेंद्रसिंहराजे. डावीकडून राहुल शिंदे, राजू भोसले, महेश गाडे, सुषमा जाधव आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhoni Retirement: एमएस धोनी IPL मधून निवृत्त! CSK कडून मोठी घोषणा, आता दिसणार या भूमिकेत

Cyber Fraud: शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने २१ लाखांची फसवणूक ;सायबर चोरट्यांनी दाखविले ३०० टक्के परताव्याचे आमिष

"बिसलेरीच्या बाटलीत लघुशंका करायचो..." अभिनेत्री राम्या कृष्णन यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : नदी स्वच्छतेच्या मोहिमेतून संसर्ग; ‘बिट्टू तबाही’ रुग्णालयात दाखल

Nagpur News: हिवाळ्यातही भाज्या महाग ;स्वस्ताईसाठी करावी लागणार डिसेंबरची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT