Government English Medium Ashram School is ISO certified Ghodegaon sakal
पुणे

घोडेगाव येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेला आय.एस.ओ.मानांकन

आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या घोडेगाव येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेला सन २०२१ या वर्षाचे आय.एस.ओ.मानांकन मिळाले

चंद्रकांत घोडेकर, घोडेगाव

घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव ) येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेला सन -2021 या वर्षाचे आय.एस.ओ.मानांकन मिळाल्याची माहिती प्राचार्य चंद्रकांत नाईकडे यांनी दिली. आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या घोडेगाव येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेला सन २०२१ या वर्षाचे आय.एस.ओ.मानांकन मिळाले आहे .इंद्रप्रस्थ सिस्टिम सीसीआरटी प्रा. लि. अहमदनगर या संस्थेचे प्रमुख अनिल येवले यांनी आय.एस.ओ. मानांकन संदर्भात परीक्षण करण्यात आले होते.

शाळेतील उत्कृष्ट भौतिक सोयी सुविधा, शाळा व परिसर स्वच्छता, विद्यार्थ्यांना दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा प्रशासन या गोष्टींचा प्रामुख्याने परीक्षणात महत्वाचा विचार करण्यात आला.या आश्रमशाळेला आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झाल्याबद्दल घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप साबळे, माजी अध्यक्ष अशोक शेंगाळे व इतर सदस्य तसेच पालक यांनी प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT