पुणे

१ कोटी खर्चून ६६ अंगणवाड्यात बोलक्या भिंती

CD

यंदा लाभार्थी विद्यार्थी सायकलींपासून राहणार वंचित

समाजकल्याण विभागाने ब्युटी पार्लर, पोलिस प्रशिक्षणासाठी वळविला निधी

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ ः सायकल व शेळीगट वाटपाच्या निधीत कपात करून प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, पोलिस भरती प्रशिक्षणासाठी ६० लाख रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाकडील ब्युटी पार्लर, पोलिस भरती प्रशिक्षणासाठी २०२६-२७ मध्ये ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यात वाढ करून ६० लाख रुपये अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली. पाचवी ते नववीतील मुला-मुलींना सायकल वाटप करण्यासाठी २० लाख रुपयांची तरतूद होती. ती पूर्णतः रद्द करण्यात आली. शेळीगट वाटपासाठी ६० लाख रुपयांवरून ३० लाख रुपयांची कपात करून ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. एमएस-सीआयटीसाठी ४० लाख रुपयांची तरतूद होती. त्यात १० लाख रुपयांची कपात करून ३० लाख रुपये करण्यात आले आहेत.

महिला शेतकरी सशक्तीकरण योजनेतून ड्रोन खरेदीसाठी तरतूद केलेली ३० लाख रुपयांची रक्कम खर्च झाली नसल्याने ही रक्कम कृषी अभियांत्रिकी योजनेसाठी वळविण्यात आली आहे. कृषी अभियांत्रिकी योजनेसाठी १ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता त्यात २९ लाख ९५ हजार रुपयांची वाढीव तरतूद केल्याने ही रक्कम १ कोटी ४५ लाख रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय कृषी अभियांत्रिकी योजनेसाठी १ कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली आहे. यास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

मुळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील ब्रह्मनाथ मंदिर परिसरात भक्तनिवास बांधणे, पोहोच रस्ता करणे या कामांसाठी १.६० कोटी रुपयांचा निधी मंजूर होता. निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती; पण निवडणूक आचारसंहितेमुळे कार्यारंभ आदेश देण्यात आला नव्हता. कार्योत्तर मान्यता मिळण्यासाठी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी विषय ठेवण्यात आला होता. यास सभेत मंजुरी देण्यात आली.

शाळा दुरुस्तीचा १.८३ कोटींचा निधी शिल्लक...

एकीकडे धोकादायक वर्गखोल्यांचे पाडकाम करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगत शाळा पाडकाम केले जात नाही, तर दुसरीकडे प्राथमिक शाळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १.८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ती रक्कम खर्ची पडली नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ९.५० लाख रुपये, प्रज्ञाशोध परीक्षा व शिष्यवृत्ती सराव परीक्षेसाठी ११.३० लाख रुपये, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ३० लाख रुपये, असा एकूण २.३९ कोटी रुपयांच्या शिल्लक निधीच्या खर्चास सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात आली.

बोलक्या भिंतींसाठी एक कोटी
जिल्ह्यातील ६६ अंगणवाड्यांमध्ये बोलक्या भिंती तयार (बाला आर्ट) करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी खर्चास मंजुरी देण्यात आली. प्रतिअंगणवाडी १ लाख ४९ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामांपोटी ठेकेदारास ९८ लाख ८९ हजार रुपये देण्यास सभेत मंजुरी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: महिलांची ओळख वडील, पती किंवा मुलांमुळे नाही... ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींनी मांडली महिलांच्या स्वातंत्र्याची भूमिका

Velhe News : राजगड तालुक्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट! भोंदूबाबा, जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्यास थेट कारवाई, वेल्हे पोलिसांचा कडक इशारा

Ausa News : शाळेत घुसून शिक्षकांना निलंबनाची धमकी; अभिजीत दिपकेसह पाच जणांवर औसा पोलिसात गुन्हा दाखल

MITCHELL STARC: मिचेल स्टार्क-शोरिफुल इस्लामचा अनोखा पराक्रम; १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात दुसऱ्यांदा घडलं असं काही!

Marathi News Live Updates : चाकणमध्ये वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT