विनायक मेटे sakal
पुणे

आर्यन खानला वाचविण्यात सरकारला रस ; विनायक मेटे

दहा महिन्यांत दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बीड जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील आत्महत्यांची संख्या त्या पटीत आहे. मात्र राज्य सरकारमधील एकाही मंत्र्याला त्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही. केवळ आर्यन खानला वाचविण्यात त्यांना रस आहे, अशी टीका शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, प्रदेश प्रवक्ता तुषार काकडे, शहराध्यक्ष भरत लगड, बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.

मेटे म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामेदेखील गांभीर्याने होत नाहीत. त्यामुळे केवळ चार ते पाच हजारांची मदत दिली जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सुटले नाहीत तर दिवाळीनंतर लगेचच बीड जिल्ह्यात शेतकरी मोर्चा काढण्यात येईल.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेळोवेळी शब्द देऊनही सरकार चालढकल करत आहे. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती देणे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी पुरवणे आदी गोष्टी होऊ शकलेल्या नाहीत, असेही ते म्हणाले.शिवसंग्रामच्यावतीने पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, किती जागा लढवणार, युती करणार की नाही, याचा निर्णय झाला नसून चर्चा चालू असल्याचे मेटे यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : टीव्हीके-काँग्रेस आघाडीला नवीन नाव

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT