पुणे

सव्वा लाखांची मागणी करणारा ग्रामविकास अधिकारी जेरबंद

CD

नोंद लावण्यासाठी सव्वा लाखांची मागणी
ग्रामविकास अधिकारी शरद कवडे अटकेत

अहिल्यानगर, ता. ३० ः मालमत्ता खरेदीदाराचे नाव ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद घेण्यासाठी सव्वा लाखांची मागणी केल्याबद्दल काष्टी (ता. श्रीगोंदे) ग्रामविकास अधिकारी शरद साहेबराव कवडे याला जेरबंद करण्यात आले. अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (३०) दुपारी २ वाजता अटकेची कारवाई केली.
काष्टी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सिटी सर्व्हे क्रमांकाची खरेदी २५ मे २०२६ रोजी करण्यात आली होती. श्रीगोंदे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात या खरेदीखताची रितसर नोंद करण्यात आली. या मालमत्तेची नोंद काष्टी ग्रामपंचायतीच्या नमुना क्रमांक ११ मध्ये करण्यासाठी खरेदीदाराच्या मुलाने काष्टीचे ग्रामविकास अधिकारी शरद कवडे यांची भेट घेतली. कवडे यांनी ही नोंद करण्यासाठी सव्वा लाख रुपयांची मागणी केली.

खरेदीदाराच्या मुलाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार नोंदविली. या विभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. तक्रारदाराने १४ ऑक्टोबर रोजी कोळगावातील स्वाद हॉटेलमध्ये ग्रामविकास अधिकारी कवडे यांची भेट घेतली. त्यावेळेस कवडे यांनी ग्रामपंचायत दप्तरी मालमत्तेची नोंद करण्यासाठी पुन्हा सव्वा लाख रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी पंचासमक्ष दर्शविली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेलवंडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कवडेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कवडे याला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं मोठं पाऊल! मुदत संपलेल्या अन्नपदार्थांच्या पुनर्विक्रीबाबत नवे नियम लागू

BJP PM Candidate Announcement for 2029 : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा PM पदाचा चेहरा ठरला! बैठकीत अमित शाहांनी अचानक जाहीर केलं 'हे' नाव; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

China EV Crisis: चिनी इलेक्ट्रिक कारचा जगात डंका, पण मायदेशात ठणठणाट! चीनच्या ईव्ही उद्योगाचं गणित कसं बिघडलं?

IND vs NZ, 4th T20I: टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगिलतं; फिलिप्सचंही केलं भरभरून कौतुक

Marathi News Live Updates : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT