Satbara Sakal
पुणे

पुरंदर मध्ये होणार शासनाचा मोफत सातबारा वाटप शुभारंभ

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मोफत सुधारित सातबारा वाटप शुभारंभ.

सकाळ वृत्तसेवा

खळद - महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मोफत सुधारित सातबारा वाटप शुभारंभ २ ऑक्टोबर रोजी खळद (ता. पुरंदर) येथील माऊली गार्डन गार्डन मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड व पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली.

या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, अपर आयुक्त निरंजन सुधांशू, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी विजय देशमुख, ई फेरफार प्रकल्पाचे राज्याचे समन्वयक रामदास जगताप, कुळ कायदा उपजिल्हाधिकारी संजय तेली आदी मान्यवर उपस्थित असणाऱ्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

शासनाच्या वतीने सध्या सर्वत्र ई पीक पाहणी मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली असून, खळद येथे तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी प्रभावती कोरे, तलाठी सोमशंकर बनसोडे, सर्व ग्रामपंचायत, सोसायटी पदाधिकारी व ग्रामस्थ प्रयत्न करीत असून २ तारखेला आपण स्वतः केलेल्या नोंदणीचा सुधारित सातबारा नागरिकांना मिळणार असून याबाबत नागरिकांना मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT