पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभासाठी राज्यापाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी विद्यापीठात आल्यानंतर विद्यार्थांनी कुलपतींची भेट घेऊन विद्यापीठ सुरू असलेल्या चुकीच्या कारभाराचे गाऱ्हाणे त्यांच्या कानावर घातले. शिवाय देशात विद्यार्थ्यांवर झालेले हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करा, "सीएए' कायदा रद्द करा, अशी मागणी करण्यात आली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील अन्य विद्यापीठांच्या शुल्कात वाढ केली आहे, त्यात कपात करावी, विद्यापीठाचा परिसर हा मुक्त असावा. पण पुणे विद्यापीठात सुरक्षेच्या नावाखाली जाचक अटी व नियम केले जात असल्याने त्याला कारागृहाचे रुप येत आहे. या अटी रद्द कराव्यात.
कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना त्यांच्या पदापेक्षा जास्त वेतन दिले जात आहे, ते रद्द करावे, संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून फेलोशिप सुरू कराव्यात. मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना निलंबित करावे अशा मागण्या यावेळी फुले-शाहू-आंबेडकर विद्यार्थी कृती समितीने केल्या आहेत, असे कृती समितीचे सतीश गोरे, रुकसाना शेख, कमलाकर शेटे, सतीश पडोळकर यांनी सांगितले.
"आजकाल विद्यापीठ, महाविद्यालयात काहीजण घुसून असमाजिक गोष्टी करत आहेत. त्यामुळे वातावरण बिघडत असल्याने सुरक्षेची खबरदारी म्हणून सुरक्षा रक्षक नेमले जात आहेत. मी सुद्धा विद्यार्थी चळवळीतून आलो आहे, मी घाबरलो नाही, तुम्ही ही घाबरू नका. तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या मला सांगा, मी त्या सोडविण्यासाठी लक्ष घालेन''
- भगत सिंह कोश्यारी, कुलपती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
विद्यापीठात शांततेत आंदोलन
पदवी प्रदान समारंभात विद्यार्थांनी गोंधळ घालू नये यासाठी विद्यापीठात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, विद्यार्थी संघटनांनी मुख्य इमारतीच्या समोर जेएनयू हल्ला, सीएए-एनआरसी रद्द करा, शुल्क माफी रद्द करा अशा मागण्यांवर हातामध्ये पोस्टर घेऊन निदर्शने केली. यावेळी काही विद्यार्थ्यानी कविता सादर करून सरकार विरोधात असंतोषही व्यक्त केला. दरम्यान, कार्यक्रमामध्ये आंदोलन होऊ नये यासाठी पोलिसांनी विद्यार्थांशी संवाद साधून त्यांना शांत केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.