Govind Khatri sakal
पुणे

गोविंद खत्री देवजीच्‍या भूमिकेत !

'एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर' या मालिकेत प्रचंड देवजीच्‍या भूमिकेत दिसत आहेत

- अरुण सुर्वे

पुणे : दिग्‍गज अभिनेते गोविंद खत्री आता एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर' या मालिकेत प्रचंड देवजीच्‍या भूमिकेत दिसत आहेत. प्रचंड देवजी हा उच्‍चभ्रू जातीचा स्‍वयं-नियुक्‍त रक्षक आहे, जो स्‍वत:ला देवानंतर मोठा असल्‍याचे मानतो. गप्‍पागोष्‍टी करताना त्‍यांनी टीममध्‍ये सामील होण्‍यापूर्वी मालिका पाहण्‍याबाबत, तसेच नवीनच सादर करण्‍यात आलेली त्‍यांची भूमिका, त्‍यांच्‍या पूर्वीच्‍या भूमिका अशा अनेक गोष्‍टींबाबत प्रांजळपणे सांगितले.

तुमची भूमिका प्रचंड देवजीबाबत सांगा?

प्रचंड देवजीचा प्रवेश तरूण भीमरावांच्‍या जीवनात अनेक संकट व आव्‍हाने आणणार आहे. पण भीमराव व त्‍यांच्‍या शिकवणी हस्‍तक्षेप करतात, ज्‍यामुळे विचारसरणीमध्‍ये मतभेद निर्माण होतात आणि तो भीमरावांच्‍या जीवनात मोठा कोलाहल निर्माण करतो. प्रचंड देवजीला भीमराव व त्‍यांच्‍या विचारसरणीविरोधात लढण्‍यासाठी आणि त्‍यांचा अपमान करण्‍यासोबत क्रूरतेने वागण्‍यासाठी नरोत्तमच्‍या रूपात सोबती मिळतो. प्रचंड देवजीच्‍या कृतींना नरोत्तमच्‍या दुष्‍ट कृत्‍यांची सोबत मिळते. पण प्रचंड देवने अवलंबलेल्‍या क्रूर मार्गामधून भीमरावांना या लक्षवेधक स्थितींचा साहसाने सामना करण्‍याची अधिक शक्‍ती मिळते. ज्‍यामधून त्‍यांचा सर्वसमावेशक दृष्टीकोन, अतूट चिकाटी व निर्धार दिसून येतो.

तुम्ही‍ही टीममध्‍ये सामील होण्‍यापूर्वी मालिका पाहत होतात का?

'एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर' ही आतापर्यंतची भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे आणि मी सुरूवातीपासूनच ही मालिका पाहत आलो आहे. रोचक बाब म्‍हणजे मी मालिकेला उत्तमरित्‍या समजून घेण्‍यासाठी आणि नवीन भूमिका साकारण्‍यासाठी माझ्या तयारीचा भाग म्‍हणून सुरूवातीचे काही एपिसोड्स पाहत आलो आहे.

तुम्‍हाला मालिकेमध्‍ये प्रवेश करण्‍यापूर्वी आंबेडकर यांच्या कामगिरींबाबत किती माहित होते?

या असाधारण लीडरची जीवनकथा भारतातील प्रत्‍येकाला माहित आहे. भारतीय संविधानाचे शिल्‍पकार म्‍हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजसुधारक, राजकारणी व कायदेतज्ञ म्‍हणून योगदान प्रत्‍येकाला प्रेरित करतात. मालिका त्‍यांची अतूट चिकाटी, दृढनिश्‍चय आणि सर्वसमावेशक दृष्टीकोनाला दाखवते. मला या महान मालिकेचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे.एखादी भूमिका, जी आजही तुमच्‍या स्‍मरणात आहे आणि व्‍यक्‍ती म्‍हणून तुमच्‍यामध्‍ये बदल घडवून आणला आहे?

माझे नशीब चांगले आहे की, मला मालिका 'श्री कृष्‍ण'मध्‍ये कर्णची भूमिका साकारायला मिळाली आणि आजही प्रेक्षक माझे त्‍या भूमिकेसाठी कौतुक करतात. या भूमिकेने एक व्‍यक्‍ती म्‍हणून माझ्यामध्‍ये मोठा बदल घडवून आणला आहे आणि माझ्या जीवनात मूल्‍याची भर केली आहे. याव्‍यतिरिक्‍त चित्रपटांनी माझ्या करिअरला मोठी कलाटणी दिली आणि मला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम व कौतुक मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT