पुणे

पदवीधर-शिक्षक निवडणूक :आजी-माजी मंत्री मैदानात उतरणार 

सकाळवृत्तसेवा

पुणे - मतदानास अवघ्या दहा दिवसांचा कालावधी राहिल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजपने राजकीय नेत्यांची फैज मैदानात उतरवली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्या (शुक्रवारी) कॉंग्रेस भवन येथे बैठक आयोजित केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मुसंडी मारण्यासाठी नवी रणनीती तयार केली आहे. 

प्रचारासाठी अवघा दहा दिवसांचा कालावधी राहिला आहे. एवढ्या कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोचण्याचे आव्हान सर्वच पक्षाच्या उमेदवारांपुढे आहे. मात्र उमेदवारांचा हा भार हलका करण्यासाठी राजकीय पक्षांनी नेत्यांची फौज रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पुण्यात येऊन प्रमुख संस्था आणि संघटनांच्या गाठीभेटी घेतल्या. 

दरम्यान उद्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील आणि विश्‍वजित कदम यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी आमदार यांना बोलविण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ येत्या दोन दिवसात भाजपचे माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यापाठोपाठ दि. 24 रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी पुण्यात दाखल होणार आहे. प्रमुख नेत्यांच्या या दौऱ्यांमुळे पुण्यात राजकीय धुरळा उडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवसेना कॉंग्रेस भवनात  
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून शहर शिवसेनेने रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. परंतु महाविकास आघाडीत पक्षाच्या वाट्याला अमरावतीची जागा आली. त्यामुळे शहर शिवसेनेने उमेदवार मागे घेतला. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) कॉंग्रेस भवन येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला शिवसेनेच्या प्रमुख नेते मंडळी आणि पदाधिकाऱ्यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते मंडळी देखील उद्या कॉंग्रेस भवनात बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?

Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला

Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!

VIDEO : बस चालवत असतानाच चालकाला अचानक आला हृदयविकाराचा झटका; मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रवाशांचे प्राण वाचवले, पण स्वत:...

Kolhapur Circuit Bench : 40 वर्षे लढून मिळवलेल्या कोल्हापूर सर्कीट बेंच विरोधात याचिका, पण एका सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण निकाली

SCROLL FOR NEXT