Ration-Shop 
पुणे

रेशन दुकानामध्ये ज्या त्या महिन्यात होणार धान्य वितरण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे धान्य एकदम देण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे, त्यात बदल करून एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य ज्या त्या महिन्यात वितरीत करण्याचा निर्णय शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाने घेतला आहे. 

शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडून यापूर्वी चालू एप्रिल महिन्यात ३ हजार ८६८.५० मेट्रिक टन गहू आणि २ हजार ५४८ मेट्रिक टन तांदळाचे दुकान दारांमार्फत, लाभार्थ्यांना वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र, पुढील मे आणि जून महिन्यासाठीचे ७ हजार ७३७ मेट्रिक टन गहू व ५ हजार ९६ मेट्रिक टन तांदूळ १० एप्रिल पासून वितरित करण्याचे नियोजन कार्यालयाने केले होते. परंतु, अडचणी निर्माण झाल्याने त्यात आता बदल करण्यात आला आहे. 

शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे धान्य पंजाब, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून येणार होते. मात्र, कामगारांचा तुटवडा आणि या धान्याची एकदम उचल करून ते भारतीय अन्नधान्य महामंडळच्या (एफसीआय) गोदामापर्यंत आणणे. तसेच तेथून पुढे रास्त भाव दुकानांपर्यंत पोचविणे अवघड झाले आहे. त्यामुळे, या निर्णयात आता बदल करावा लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT