election  sakal
पुणे

Gram Panchayat Election : भोरला ८४ टक्के मतदान; शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण

५ हजार ३२८ पुरुष मतदारांपैकी ४ हजार ५२२ जणांनी मतदान केले. सर्वाधिक ९०.८२ टक्के मतदान हे जयतपाड ग्रामपंचायतीमध्ये झाले आहे.

विजय जाधव, भोर

भोर - तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ८३.५४ टक्के मतदान झाले असून मतदान प्रक्रीयेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक आणि पोटनिवडणूकीतील १० हजार २५८ मतदारांपैकी ८ हजार ५७० मतदारांनी मतदान केले. महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने मतदान केले आहे. महिलांच्या मतदानाची टक्केवारी ८२ तर पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ८४ आहे. ४ हजार ९३० महिला मतदारांपैकी ४ हजार ४८ महिलांनी मतदान केले.

तर ५ हजार ३२८ पुरुष मतदारांपैकी ४ हजार ५२२ जणांनी मतदान केले. सर्वाधिक ९०.८२ टक्के मतदान हे जयतपाड ग्रामपंचायतीमध्ये झाले आहे. त्याखालोखाल दापकेघर ग्रामपंचायतीमध्ये ८९ टक्के आणि हिर्डोशी, महुडे खुर्द आणि माळेगाव ग्रामपंचायतीमध्ये ८८ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी ७२ टक्के मतदान हे शिरवली हिमा ग्रामपंचायतीमध्ये झालेले आहे.

शिरवली हिमा ग्रामपंचायतीमध्ये ७६४ मतदारांपैकी ४५९ जणांनीच मतदानाचा हक्क बजावला. वडतुंबी गावात १ हजार २५० मतदार असूनही केवळ ९३१ मतदारांनी मतदान केले आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व मतदान यंत्रे शहरातील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत जमा करण्यात आले. औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमध्ये सोमवारी (ता.६) सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी १० टेबल्स ठेवण्यात आले असून साडेबारापर्यंत सर्व निकाल हाती येणार असल्याचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT