Haveli Election Result 2021 
पुणे

Haveli Election Result 2021 : पूर्व हवेलीतील भाजपची एकमेव ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे

सकाळ ऑनलाईन टीम

राज्यातील वेगवेगळ्या भागात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे कल हळूहळू हाती येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामंपचायतीचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होतील. हवेली तालुक्यातील कुडजे, डोणजे आणि राहटवडे गावातील ग्रामपंचायतीचे निकाल हातील आले आहेत. कुडजेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी 7-3 असा निकाल लागला आहे. 

कुडजे ग्रामपंचायत :  7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जागा निवडून आले आल्या आहेत. याठिकाणी काँग्रेसच्या 3 उमेदवारांना यश आले आहे. माजी सरपंच समीर राष्ट्रवादीच्या चार जागा या पायगुडे यांच्या पॅनलच्या आहेत तर काँग्रेसचे हर्षल पायगुडे यांच्या पॅनलचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. 

डोणजे गाव

राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेच्या सभापती महिला बाल कल्याणच्या पूजा पारगे यांच्या गावात 11 पैकी 10 जागा बिनविरोध झाल्या होत्या. याठिकाणी एका जागेवर पूजा पारगे यांच्या पॅनेलच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. 
 

राहटवडे गावात 9 जागांपैकी 9 जागा बिनविरोध झाली 9 पैकी 8 जागेवर महिलांना संधी दिली आहे. एका जागेवर पुरुषाला संधी दिली आहे.  

पूर्व हवेली ग्रामपंचायत अपडेट
नायगाव ग्रामपंचायतीमध्ये 11 जागांसाठी निवडणूक रंगली होती. यात राजेंद्र रतन चौधरी यांच्या  पॅनेलचे 7 उमेदवार विजयी झाले. यापूर्वीच याच पॅनलचा एक उमेदवार बिनविरोधा निवडून आला होता. विरोधी पॅनलने 3 जागांवरच यश मिळवता आले. 

आळंदी म्हतोबाची ग्रामपंचायत १३ जागांसाठी निवडणूक-

दिलीप वाल्हेकर यांच्या श्रीनाथ म्हातोबा पॅनलच्या दहा उमेदवारांचा विजय झाला असून याच पॅनलमधील 3 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. आळंदीत विरोधी म्हतोबा जोगेश्वरी पॅनेलचा दारुण पराभव झाला. याठिकाणी पूर्वी दिलीप वाल्हेकर यांच्या श्रीनाथ म्हातोबा पॅनेलचीच सत्ता होती. त्यांना सत्ता कायम राखण्यात यश आले आहे. 

शिंदवणे ग्रामपंचायत 13 जागांसाठी निवडणूक 

विद्यमान सरपंच आण्णासाहेब महाडीक यांच्या संत यादवबाबा पॅनेलचे 9 उमेदवार विजयी. याच पॅनेलची एक उमेदवार बिनविरोध तर  विरोधी शिवछत्रपती पॅनेलला 1 जागा. 2 जागेवर  खेडेकर यांची जयमल्हार आघाडीवर आहेत. आण्णासाहेब महाडीक यांच्या संत यादवबाबा पॅनेलने सत्ता राखली.
 

सोरतापवडी ग्रामपंचायत 15 जागांसाठी निवडणूक 

विद्यमान सरपंच सुदर्शन चौधरी व सागर चौधरी यांच्या भाईकेडी चौधरी पॅनलचे 7 उमेदवार विजयी. तर विरोधी सोरतपेश्वर पॅनलला 8 जागा. भारतीय जनता पक्षाची पुर्व हवेलीतील एकमेव सोरतापवडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे आली आहे.

कोरेगाव मूळ एकूण जागा 13 असून 10 जागांसाठी निवडणूक

दिलीप शितोळे, विठ्ठल शितोळे व आप्पा कड, बापूसाहेब बोधे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलला 10पैकी 8 जागा तर  आघाडीच्या पॅनलच्या यापूर्वीच 3 जागा बिनविरोध मिळाल्या आहेत. विरोधी भैरवनाथ पॅनलला अवघ्या 2 जागेवरच समाधान मानावे लागले.

कुंजीरवाडी ग्रामपंचायत 17 जागांसाठी निवडणूक 

माजी सरपंच सचिन तुपे, संतोष कुंजीर व संदीप धुमाळ यांच्या नेतृवाखाली काळभैरवनाथ  पॅनलला 9 जागा. तर भरत निगडे यांच्या आघाडीला 3 जागा. व अपक्ष 2 जागा.  सचिन तुपे यांच्या काळभैरवनाथ पॅनलने सत्ता राखण्यात यश मिळाले आहे
 
लोणी काळभोर ग्रामपंचायत 17 जागांसाठी निवडणूक

परिवर्तन पॅनल 13  तर अष्टविनायक पॅनलने 4 जागा जिंकल्या आहेत.   यशवंत सहकारी साखऱ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर माजी जिल्हा परीषद सदस्य विलास काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे जेष्ठ संचालक सुभाष काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर यांची ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता. तर शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांना मोठा धक्का. परिवर्तन पॅनलचे प्रभाग क्रमांक 4 चे योगेश काळभोर सर्वांधिक मताने विजयी तर त्याच पॅनलच्या प्रभाग क्रमांक 6 च्या संगीता काळभोर या सर्वात कमी म्हणजेच एका मतानी विजयी. माधव काळभोर यांनी प्रशांत काळभोर यांच्याकडून सत्ता खेचून घेतली. 

केसनंद ग्रामपंचायतीवर अखेर शिवसेनेचे वर्चस्व 

केसनंद, हवेली तालुक्यातील महत्वपूर्ण अशा केसनंद ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनेलने निर्वीवाद वर्चस्व मिळवले. तर सत्ताधारी भैरवनाथ पॅनेलला केवळ दोन जागा मिळाल्या.

सांगवी सांडसमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलची एकहाती सत्ता

सांगवी सांडस ग्रामपंचायतीत 7 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या ग्रामदैवत श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने सर्व जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. तर विरोधी विष्णुकृपा ग्रामविकास पॅनेलला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

लोणी काळभोर

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राज्य साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण उर्फ तात्या काकडे यांचे नेतृत्वाखालील चिंतामणी ग्रामविकास पॅनेलने 10 जागा जिंकून बाजी मारली. तर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब काकडे व माजी सरपंच नवनाथ काकडे यांच्या नेतृत्वाखाली महातारी आई माता ग्रामविकास पॅनेलला 7 जागांवर समाधान मानावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT