मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या
निवडणुका तातडीने घ्या
सरपंच परिषदेची ग्रामविकासमंत्र्यांकडे मागणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई ः महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका तातडीने घेण्यात याव्यात. प्रशासक नियुक्तीऐवजी लोकनियुक्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली. मंत्रालयात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मुंबईत ‘सरपंच भवन’ उभारावे, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली.
ग्रामपंचायत निवडणुकांबाबत सरकारकडे पाठपुरावा करून योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. बैठकीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवरील प्रशासक नियुक्त्या, आगामी ग्रामपंचायत निवडणुका, सरपंच व ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या विविध प्रलंबित मागण्या तसेच ग्रामपंचायतींच्या कामकाजाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली.
राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका न झाल्याने प्रशासक नियुक्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केल्यास त्याचा त्रास ग्रामस्थांना होऊ शकतो. त्यामुळे निवडणुका घेऊन लोकनियुक्त लोकप्रतिनिधी असावेत, अशी मागणी करण्यात आली.
राज्यातील सरपंच व ग्रामपंचायत प्रतिनिधींना मुंबईत आपल्या मागण्या मांडण्यासाठी तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘सरपंच भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणीही यावेळी ठामपणे मांडण्यात आली.
याप्रसंगी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे-पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष आनंदराव जाधव, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजमल भागवत, सोलापूर जिल्हा समन्वयक अंबादास गुजर, अहिल्यानगर समन्वयक वीरूपाक्ष घेरडे, उमेश भालसिंग, सातारा जिल्हा सचिव धनवडे, राज्य कोअर कमिटी उपाध्यक्ष जे. डी. टेमगिरे, भगवान भालसिंग आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.