dorlewadi sakal
पुणे

Gram Panchyat Results : डोर्लेवाडीत जय हनुमान पॅनलचा विजय,सरपंचपदी सुप्रिया मनोज नाळे मोठ्या मताधिक्याने विजयी

येथील ग्रामपंचायतीच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत जय हनुमान पॅनलचे पांडुरंग सलवदे हे तब्बल ८७० मतांच्या फरकाने थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आले होते.

सोमनाथ भिले

डोर्लेवाडी - डोर्लेवाडी (ता.बारामती) येथील ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी जय हनुमान पॅनलच्या सुप्रिया मनोज नाळे मोठ्या फरकाने विजयी झाल्या.शिवाय या पॅनलने १५ पैकी ८ जागा जिंकून सत्ता कायम ठेवली.विरोधी जय भवानीमाता पॅनलला ७ जागेवर समाधान मानावे लागले.

येथील यावर्षीची पंचवार्षिक निवडणुक अत्यंत चुरशीची झाली होती.पारंपारिक प्रतिस्पर्धी जय भवानीमाता व जय हनुमान पॅनल यांच्यातच नेहमी लढत पहावयास मिळायची मात्र यावर्षी स्वाभिमानी अल्पसंख्यांक जनसेवा पॅनलने सरपंचपदासह काही ठिकाणी सदस्य उभे केल्याने दोन्ही पॅनलपुढे मोठे आव्हान निर्माण केले होते.प्रतिस्पर्धी दोन्ही पॅनलकडून मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबविण्यात आली होती.

८२ टक्के मतदान झाल्यामुळे सर्वांची धाकधूक वाढली होती.जय भवानीमाता पॅनलचे तीन व जय हनुमान पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरीत १० जागेसाठी २६ उमेदवार निवडणुक रिंगणात होते.व सरपंचपदासाठी ४ उमेदवार उभे होते.जय हनुमान पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार सुप्रिया मनोज नाळे यांना १९१४ मते मिळाली.विरोधी जय भवानीमाता पॅनलच्या उमेदवार ज्योती अतुल भोपळे यांना १५३१ मते मिळाली. स्वाभिमानी अल्पसंख्यांक जनसेवा पॅनलच्या उमेदवार रोहिणी हरिभाऊ आटोळे यांना १००६ मते तर अपक्ष प्रभावती कांतीलाल नाळे यांना १६७ मते मिळाली.

जय हनुमान पॅनलचे विजयी उमेदवार - छबुबाई हनुमंत मदने,विश्वजीत भारत घोडे,राणी निरंजन नेवसे,रेखा माणिक नाळे,विद्या सचिन काळकुटे,राहुल सुरेश भोपळे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार- सुमित्रा अजित वामन,सुनिल मारुती म्हेत्रे

जय भवानीमाता पॅनलचे विजयी उमेदवार- सचिन चंद्रकांत निलाखे,सोनाली दिलीप नवले,प्रशांत बळीराम जाधव,संदीप पांडुरंग कुदळे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार- बीबी शामराव शिंदे,सोनाली अमोल शिंदे,राजेंद्र दुर्गा शिंदे

आदर्श सरपंचाचा दारून पराभव...

येथील ग्रामपंचायतीच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत जय हनुमान पॅनलचे पांडुरंग सलवदे हे तब्बल ८७० मतांच्या फरकाने थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आले होते.पाच वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेसह विविध ५ खासगी संस्थांचे आदर्श सरपंच पुरस्कार मिळाले होते.यावर्षी इतर नव्या उमेदवारांना संधी देता यावी म्हणून पॅनलने मागणी असतानाही त्यांना उमेदवारी नाकारली होती.मात्र तरीही सलवदे हे सदस्यपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते.शेवटी ज्या जनतेनी निवडून दिले त्याच जनतेनी यावेळी मात्र त्यांचा दारुण पराभव केला.सलवदे यांना केवळ १६८ मतांवर समाधान मानावे लागले.या पराभवाची चर्चा सर्व तालुक्यात होती.

स्वाभिमानी अल्पसंख्यांक जनसेवा पॅनलची कडवी झुंज ..

येथील निवडणुकीतील सरपंचपदाच्या उमेदवार रोहिणी हरिभाऊ आटोळे यांनी मागील ३ वर्ष गावात मोठ्या प्रमाणात सामजिक कार्यात सहभाग घेऊन विविध उपक्रम राबविले होते.अनेक शाळा व संस्थांना सामजिक भावनेतून मदत केली होती.त्यांनी गावातील कोणाचेही राजकीय पाठबळ नसताना स्वाभिमानी अल्पसंख्यांक संघटनेच्या जनसेवा पॅनलच्या माध्यमातून या पारंपारिक दोन्ही पॅनलपुढे फार मोठे आव्हान उभे केले होते.दोन्ही पॅनलनी या उमेदवाराचा धसका घेतला होता.त्यानुसार फार मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण झाले.मात्र तरीही या उमेदवाराने तब्बल १००६ मते मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Latest Marathi News Live Update: राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती - अतुल सावे

SCROLL FOR NEXT