पुणे

रेशनवर आता चना, उडीद डाळही नियमित मिळणार 

सकाळवृत्तसेवा

पुणे : रेशन दुकानात केवळ दिवाळीतच नव्हे, तर त्यानंतरही शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला तूरडाळीसोबतच उडीद आणि चना डाळही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत डाळी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली. 

शहरात दर महिन्याला साडेपाच हजार मेट्रिक धान्य वितरित करण्यात येते. दर महिन्यात सात तारखेला धान्य पुरवठा केला जातो. परंतु, दिवाळीच्या सणामुळे 30 ऑक्‍टोबर रोजी गहू, तांदूळ हे धान्य पोच करण्यात आले. केवळ अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला साखर दिली जाते. परंतु, दिवाळीसाठी अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांनाही साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी दोन हजार 618 क्‍विंटल साखर उपलब्ध झाली असून, ती रेशन दुकानापर्यंत पोच केली आहे. 

केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत भरड धान्य वितरित केले जाते. त्यानुसार राज्य सरकारने रेशन दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारकांना दिवाळीपासून तूरडाळीसह चना डाळ, मूग आणि उडीद डाळ दर महिन्याला नियमित उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व डाळी एक किलोच्या पॅकिंगमध्ये देण्यात येणार आहेत. उडीद डाळ शनिवारपासून देण्याचा प्रयत्न आहे. परंतु, मूग डाळ उपलब्ध होण्यास काही अवधी लागेल. तसेच, या महिन्यात 34 मेट्रिक टन टाटा मीठ उपलब्ध झाले असून, त्याचा दर 14 रुपये किलो आहे. 

दिवाळी सणामुळे एक तारखेपासून धान्य उपलब्ध करून देण्यात आले. तसेच, साखरही उपलब्ध झाली आहे. परंतु, पॅकिंगच्या कारणास्तव डाळी उपलब्ध होण्यास उशीर झाला. या आठवड्याच्या अखेरपर्यंत डाळी उपलब्ध करून देण्यात येतील. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे पॉस मशिनवरून धान्य देण्यास अडचणी आल्या. त्यासाठी रेशन दुकानदारांकडून ग्राहकांच्या वेळेचे नियोजन करण्यात आले आहे. 
- अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी 

डाळींचा दर - प्रति रेशनकार्ड एक किलो 
चना डाळ- 35 रुपये 
तूर डाळ- 35 रुपये 
उडीद डाळ- 44 रुपये किलो 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT