पुणे

ग्रामसुरक्षा दलाने शेतकऱ्यांना मदत करावी

CD

वालचंदनगर, ता. १० : ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांनी शेतकऱ्यांच्या मनातील ड्रोनची भीती काढून शेतकरी व नागरिकांना मदत करण्याचे आवाहन वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांनी केले.
जंक्शन (ता. इंदापूर) येथे वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसुरक्षा दलाचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विजय टिळकीकर उपस्थित होते. यावेळी रतिलाल चौधर यांनी सांगितले की, रात्रीवेळी ड्रोनच्या घिरट्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक घाबरले आहेत. ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांनी रात्री गस्त घालावी. नागरिकांना मदत करावी. तसेच परिसरामध्ये होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी मदत करावी. काही संशयित व्यक्ती व इतर वस्तु दिसल्यास तातडीने पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. यावेळी लासुर्णे परीसरातील ५० ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांना टी- शर्ट, बॅटरी, काठी व शिट्टी देण्यात आली.

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जुलै महिन्यामध्ये इंदापूर तालुक्यात येणार आहे. पालखी सोहळ्याचे नियोजन, बंदोबस्त व नागरिकांना दर्शनासाठी मदत करण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT