पुणे

पिंपळवंडी ग्रामसभा गदारोळात तहकूब

CD

पिंपळवंडी, ता. ८ :  ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. ८) आयोजित विशेष ग्रामसभेत प्रचंड गदारोळ केला. सलग दुसऱ्यांदा सभा तहकूब झाल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. अखेर आक्रमक पवित्र्यामुळे सरपंच मेघा काकडे यांना सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढवली.
सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत सभागृहात सभेला सुरुवात झाली, मात्र शेकडो नागरिक उपस्थित असल्याने जागा अपुरी पडली. त्यामुळे कामकाज तातडीने श्री मळगंगा माता सभागृहात हलविण्यात आले. तेथे ग्रामस्थांनी पाणी, रस्ते आणि इतर प्रलंबित समस्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. यावर, ग्रामसेवक रजेवर असल्याने प्रशासकीय पातळीवर सर्व निर्णय थांबले असून, कायमस्वरूपी अधिकाऱ्यासाठी जुन्नरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी मागणी केल्याचे सरपंच आणि सदस्यांनी सांगितले. मात्र, या स्पष्टीकरणाने ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. ‘जबाबदार प्रशासकीय अधिकारी नसताना ग्रामसभा बोलावलीच कशी?’ असा थेट सवाल करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अधिकाऱ्याच्या उपस्थितीशिवाय कोणताही ठराव मंजूर होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरपंच मेघा काकडे यांनी अखेर ग्रामसभा तहकूब करत असल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे अनुसूचित जमातीतील अनेक गरजू लाभार्थींच्या घरकुलांचे ठराव रखडले असून, त्यांची प्रतीक्षा आता अनिश्चित काळासाठी लांबली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT