Gun Firing Sakal
पुणे

Walchandnagar Crime : पराभूत उमेदवारकडून दशहतीसाठी हवेत गोळबार; पोलिसांनाही केला जीवे मारण्याचा प्रयत्न

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये पराभव झाल्याने उमेदवाराकडून गावामध्ये दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न

राजकुमार थोरात

वालचंदनगर - ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये पराभव झाल्याने काझड (ता. इंदापूर) गावामध्ये दशहत निर्माण करण्यासाठी हवेमध्ये गोळीबार करुन पळून जात असताना पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी राहुल चांगदेव नरुटे व समीर मल्हारी नरूटे (रा. काझड) यांच्यावर गुन्हा दाखल केला. रविवारी (ता. ५) ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या असून साेमवारी निकाल जाहीर झाले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये राहुल चांगदेव नरुटे व समीर मल्हारी नरूटे हे दोघे उभे होते.

दोघांचा ही पराभव झाल्याने निकालानंतर सोमवारी (ता.६) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास राहुल नरुटे याने पिस्तुलामधून गोळीबार केल्याची घटना घडली. पोलिसांनी दोघाचा पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न करीत होते. चौकामध्ये दोघांची गाडी अडवत असताना चारचाकी गाडी अंगावरती घालून पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिस हवालदार गणेश काटकर यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT