bhor sakal
पुणे

Grampanchyat Election Result : कांबरे खुर्द सरपंचपदी मनिषा ओंबळे; १०१ मतांनी मिळविला विजय

सरपंचपदाच्या निता करंजकर यांचा १०१ मतांनी तर दत्तात्रेय करंजकर यांचा ५७ मतांनी पराभव झाला.

विजय जाधव

भोर - तालुक्याच्या भूतोंडे खो-यातील कांबरे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनिषा सुदाम ओंबळे आणि सदस्यपदी दत्तात्रेय सुकाळे विजयी झाले. त्यांनी सरपंच पदाचे विरोधी उमेदवार निता दत्तात्रेय करंजकर आणि सदस्य पदाचे उमेदवार दत्तात्रेय करंजकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. सरपंचांसह ८ सदस्यसंख्या असलेल्या कांबरे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये ६ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

केवळ सरपंच आणि एका सदस्याच्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. करंजकर कुटुंबातील निता करंजकर या सरपंचपदासाठी तर त्यांचे पती दत्तात्रेय करंजकर हे सदस्यपदाच्या जागेसाठी उमेदवार होते. परंतु दोघांचाही मोठ्या फरकाने पराभव झाला. सरपंचपदाच्या निता करंजकर यांचा १०१ मतांनी तर दत्तात्रेय करंजकर यांचा ५७ मतांनी पराभव झाला.

ग्रामपंचायतीमधील रेश्मा गणेश खुळे, मोहिनी संपत शिळीमकर, आरती विष्णू चौधरी, किरण लालासाहेब चिकणे, अंकुश महादेव उल्हाळकर आणि सुवर्णा संतोष शिळीमकर हे सहा उमेदवार बिनविरोध निवडणून आलेले आहेत. आमच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी असी आमची इच्छा होती. परंतु लोकशाही असल्यामुळे काहींनी जाणीवपूर्वक निवडणूक लादल्यामुळे आम्हाला निवडणूकीला सामोरे जावे लागले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सोमवारी विजयी झाल्यानंतर कांबरे खुर्द व कांबरे ब्रु च्या ग्रामस्थांनी विजयी उमेदवारांचे फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि गुलालांची उधळण करीत अभिनंदन केले. विजयी उमेदवारांनी भोर शहरातील चौपाटी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आनंदोत्सव साजरा केला. गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शाखाली महिलांच्या स्वावलंबनासाठी आणि गावााच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचिक सरपंच मनिषा ओेबळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rule From 1 August: 1 ऑगस्टपासून बदलणार अनेक नियम! LPG, रेल्वे तिकीट, बँकिंगसह 'हे' 5 मोठे बदल जाणून घ्या

IND vs SL Test : जसप्रीत बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार? प्रमुख गोलंदाजाचा फिटनेस अहवाल आला समोर; नेमकं काय आहे त्यात?

महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर व्हायब्रेटर ठेवणं, हा बलात्कारच! केरळ उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, आरोपीची शिक्षा कायम...

Farmer Loan: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! कर्जमाफीच्या रकमेबाबत मोठे स्पष्टीकरण; संभ्रम कायमचा दूर, प्रशासनाने दिली महत्त्वाची माहिती

Latest Marathi News Live Update : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT