shirsufal 
पुणे

ग्रामसेवकांच्या पगारात होणार वाढ

संतोष आटोळे

शिर्सुफळ : पुणे जिल्ह्यातील 315 ग्रामसेवकांना अश्वासित प्रगती योजना व वरिष्ठ वेतन श्रेणीला मंजुरी देण्यात आली आहे.यामुळे ग्रामसेवकांच्या पगारात वाढ होणार आहे.याबद्दल ग्रामसेवक युनियनने जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते व मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांचा सत्कार करुन आभार मानन्यात आले.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन पुणे शाखा यांनी ग्रामसेवक संवर्गाच्या प्रंलबित कामाबाबत जिल्हा प्रशासनाकडे  पाठपुरावा केला. यानुरुप पुणे जिल्ह्यातील 12 वर्ष सेवा पुर्ण झालेल्या 238 ग्रामसेवकांना अश्वासित प्रगती योजना व 24 वर्ष सेवा पुर्ण झालेल्या 77 ग्रामविकास आधिकारी यांना वरिष्ठ वेतन श्रेणीच्या लाभाला मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी मंजुर दिली. यामुळे संबंधितांचा ग्रेड पे वाढला असुन संबंधित कालावधीपासुनचा फरक रक्कम व नियमीत पगारात वाढ होऊन लाखो रुपायाचा आर्थिक लाभ मिळणार आहे. ग्रामसेवकांच्या सेवा विषयक प्रंलबित प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी सहकार्य केले बद्दल युनियनच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, पंचायत विभागाचे  उपमुख्य कार्यकारी आधिकारी संदीप कोहिनकर यांचे आभारासह सत्कार करण्यात आला. 

याबाबत बोलताना युनियनने विभागीय अध्यक्ष अमोल घोळवे म्हणाले, ग्रामसेवक संवर्गाचे सेवा विषयक स्थायीत्व लाभ , 12 वर्ष ,24 वर्ष सेवा लाभ, निलंबीत ग्रामसेवक पुन्रस्थापना, कंत्राटी कर्मचारी कायम करणे हे प्रश्न मार्गी लागलेले आहेत तसेच विस्तार आधिकारी, ग्रामविकास आधिकारी पद्दोनती , आदिवासी भागात काम करणाऱ्या ग्रामसेवकांना एकस्तर वेतन क्षेणी, अंशदायी पेन्शन योजना कपात रक्कम ही कामे ही या महिन्याभरात सुटण्याच्या मार्गावर आहेत असे आश्वासन सुरज मांढरे यांनी दिले.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे विभागीय अध्यक्ष अमोल घोळवे, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जगताप, सरचिटणीस संदीप ठवाळ, मानद अध्यक्ष बाळासाहेब गावडे , श्रीकांत वाव्हळ, भगवान घोगरे, दत्तात्रय परदेशी, सारिका कडुसकर, शहानुर शेख, स्वप्नील गायकवाड यांच्यासह युनियन पदाधिकार उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT