Lok Sabha Poll 2024 Sakal
पुणे

Lok Sabha Poll 2024 : शंभरी पार केलेल्या आजोबा, मुलगा नातुने केले मतदान

खडकवासला मतदारसंघातील नांदेड गावात योग जुळला

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : वयाची शंभरी पार केलेले आजोबा, वडील सत्तरीत पोहोचलेले तर मुलाने ४० पार केली‌ आहे. अशा या तिघांनी आज लोकसभेच्या निवडणुकीत आज मतदान करीत संविधानाने दिलेला अधिकार बजावत लोकशाहीचा वारसा जपला. खडकवासला मतदारसंघातील नांदेड गावात हा योग जुळून आला होता.

नांदेड हे नांदेड सिटी झाल्यामुळे अधिक चर्चेत आलेले गाव. या गावातील दारवटकर परिवारातील निवृत्ती शिवराम दारवटकर त्यांनी वयाची १०० वर्ष पूर्ण केले आहे. त्यांना पाच मुली व दशरद व किसन अशी दोन मुले आहेत. त्यांच्या मोठ्या मुलगा दशरथ, दशरथ यांचा मोठा मुलगा अजय दारवटकर या तिघांनी मिळून नांदेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज मतदान केले.

दारवटकर यांना आज मतदानासाठी जायचं असल्यामुळे सकाळी नऊ वाजता तयार होऊन बसले होते. त्यांच्या नातू ने १० वाजता आपण मतदान करायला जाऊ. असे सांगितले. दहा वाजले तरी नातू आला नाही. त्यामुळे ते नातवाला सातत्याने फोन केला. ‘तू लवकर ये, मला मतदान करून यायचं आहे. त्यानंतर, देवपूजा हरिनाम जप हा माझा नित्य नयम करणार आहे.

दारवटकर यांचा जन्म १९ मे १९२३ नांदेड येथे झाला. त्या काळातील तिसरी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते आजही मोडी लिपीत लिहितात वाचतात. जन्मापासून ते माळकरी आहेत. त्या काळी त्यांनी कुस्ती क्षेत्रात नाव गाजवले. रोज दहि व भात खाण्याचा आहार ते गेली २५ वर्षापासून पाळत आहे.

नेहरूंच्या काळात त्यांनी म्हणजे १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत पहिले मतदान केले. त्यावेळी हा परिसर पुणे लोकसभा मतदार संघात होता.काँग्रेसच्या कडून नरहरी गाडगीळ उभे होते. गाडगीळ यांच्या प्रचारात ते आघाडीवर होते. पहिल्यांदा मतदान करणार असल्याने गावकऱ्यांना चैतन्य होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी ताज्या होत्या. देशात लोकशाही राजवट सुरू होत असल्याने आम्ही आनंदी होतो.

वाढत्या वयाबरोबर शरीर क्षीण होत चालले आहे. त्यांना अद्याप आपली गोष्ट आपण करण्याचा त्यांचा आग्रह असतो. खुर्चीवर बसून समोरच्या व्यक्तीशी बोलतात. निवृत्ती दारवटकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत होती. शेती करत फळांचा व्यवसाय केला. फळांचे व्यापारी म्हणून ते महात्मा फुले मंडई, मार्केट यार्डात प्रसिद्ध होते.

आम्ही लोकशाहीचा वारसा जसा जपला. तसा आजोबांचा काळातील पक्षाचा वारसा देखील आम्ही पुढे सुरू ठेवला आहे.

-अजय दारवटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT