Flood-Water
Flood-Water 
पुणे

चार वर्षाच्या नातवासह आजी गेली वाहून

महेंद्र शिंदे

कडूस - खेड तालुक्याच्या चासकमान जलाशय परिसराला गुरुवारी (ता. 22) सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह परतीच्या वादळी पावसाने झोडपले. यात कहू कोयाळी (ता. खेड) येथील आजी आणि नातू डोंगरावरून आलेल्या पाण्यात वाहून गेले. भोराबाई बुधाजी पारधी (वय 43) आणि साहिल दिनेश पारधी (वय 4) असे वाहून गेलेल्या आजी आणि नातवाचे नाव आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चासकमान धरण भागातील कहू कोयाळी, साबुर्डी, वेताळेसह कोहिंडे, सायगाव, कडूस आदी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने झोडपले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुमारे तासभर ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला. पावसात चासकमान जलाशय परिसरातील कहू कोयाळी येथे महिलेसह चिमुकला मुलगा पाण्यात वाहुन गेल्याची धक्कादायक घटना घडली. हा संपूर्ण परिसर डोंगराळ आहे. डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील ओढे नाले दुथडी भरुन वाहत होते. या पावसातच कहू कोयाळी येथील भोराबाई पारधी नातवासह कांद्याचे रोप घेऊन त्या घरी निघाल्या होत्या. नातू साहिल याच्या सोबत रस्त्यावरील मोरीवर त्या निवाऱ्यासाठी थांबल्या होत्या. पावसाचा जोर काही कमी होत नव्हता.

डोंगरावरून वाहत आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे भोराबाई व नातू साहिल रस्त्यावरील मोरीवरुन पाय घसरुन पडल्या. वाहत्या पाण्याचा जोर अधिक असल्याने दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले. हे पाणी जवळच्या चासकमान जलाशयाला जाऊन मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी दोघांचाही शोध घेतला. परंतु रात्री उशिरापर्यंत दोघांचा शोध लागला नाही. दरम्यान, तहसिलदार सुचित्रा आमले व प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन टीमसह घटनास्थळाची पाहणी केली. दुसऱ्या एका घटनेत साबुर्डीच्या झाकलेवाडी येथील तुकाराम बारकू खंडागळे यांच्या गाईवर वीज पडली. यात गाईचा मृत्यू झाला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT